आजचा वाढदिवस

श्रीरंग बारणेंचा राजकीय प्रवास : नगरसेवक ते खासदार 

सरकारनामा ब्युरो

श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे खासदार आहेत. नगरसेवकाचे ते खासदार झालेले आहेत. ते 2014 ला प्रथमच लोकसभेला निवडून आले.

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी आणि चिंचवड हे विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये मोडतात.त्यामुळे पिंपरी-चिंचवडचेही खासदार म्हणून ते ओळखले जातात. अप्पा म्हणून ते परिचित आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक असताना ते खासदार झाले. ते सलग 25 वर्षे नगरसेवक होते. पूर्वी ते कॉंग्रेसमध्ये होते. पालिकेत शिवसेना गटनेते असतानाच त्यांनी लोकसभा लढविली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे खासदार म्हणून ते ओळखले जातात.सलग पाच वर्षे त्यांना संसदरत्न हा पुरस्कार लोकसभेतील कामगिरीसाठी मिळालेला आहे.

त्यांचा मतदारसंघ घाटावर आणि घाटाखाली विभागलेला असल्याने दोन्ही ठिकाणी त्यांची संपर्क कार्यालये आहेत.पुन्हा ते लोकसभेच्या तयारीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT