आजचा वाढदिवस

आजचा वाढदिवस : डॉ. प्रीतम मुंडे , खासदार - बीड

सरकारनामा ब्युरो

डॉ. प्रीतम मुंडे या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या द्वितीय कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण
आहेत. वैद्यकीय क्षेत्रात पदवी (एम.बी.बी.एस) व सौंदर्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी (एम.डी.डर्मेटॉलॉजी) घेतलेल्या डॉ. प्रीतम मुंडे दुसऱ्या वेळी खासदार आहेत. वडील राजकारणात होते तरी विवाहापूर्वी वा नंतर त्यांचा राजकारणात कुठलाही वावर नव्हता. 

नाशिक येथील गौरव खाडे यांच्याशी विवाहानंतर त्या गृहिणी आणि वैद्यकशास्त्रात काम करत होत्या. दरम्यान, 2014 मध्ये दिवंगत
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली दुर्दैवी निधनाने लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उतरलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळविला. 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी पावणेदोन लाखांवर मतांनी विजय मिळवत दुसऱ्यांदा लोकसभेत प्रवेश केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT