raosaheb-danve
raosaheb-danve 
आजचा वाढदिवस

आजचा वाढदिवस : खासदार रावसाहेब दानवे - केंद्रीय राज्यमंत्री 

सरकारनामा ब्यूरो

जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा आज वाढदिवस. भोकरदन तालुक्‍यातील जवखेडा या गावातील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरात कुठलाही राजकीय वारसा नसतांना रावसाहेब दानवे यांनी ग्रामपंचायतीपासून आपल्या राजकारणाला सुरूवात केली. सरपंच, पंचायत समिती सभापती, दोनवेळा भोकरदन विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार व सलग पाचवेळा जालना लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी 2014 मध्ये कामाला सुरूवात केली. आपल्या कारकीर्दीत भाजपला राज्यात विधानसभा, लोकसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत अभूतपुर्व यश मिळाले. केंद्रातील मोदी सरकारमध्ये रावसाहेब दानवे यांना केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करण्याची देखील संधी मिळाली होती.


2019 च्या लोकसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजय मिळवल्यानंतर केंद्रात पुन्हा एकदा दानवे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले. 

याशिवाय भोकरदन तालुक्‍यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना आणि अनेक शैक्षणिक संस्था देखील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. राजकारणातील एक प्रसिध्द तितकेच वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून रावसाहेब दानवे ओळखले जातात. आपल्या ग्रामीण भाषेमुळे रावसाहेब दानवे यांची भाषण नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT