राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) (सिन्नर) (Sinner) हे गत् चार टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी विविध प्रकल्प राबविल्यामुळे त्यांचे समर्थक त्यांचा उल्लेख विकास पुरुष असा करतात.
श्री. कोकाटे महाविद्यालयीन चळवळीपासून सक्रीय आहेत. एनएसयुआय, युवक काँग्रेसमध्ये ते सक्रीय होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द काँग्रेस पक्षातून सुरु केली. जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम केले. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ते गेली वीस वर्षे संचालक आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सहकारी अशी त्यांची काही काळ प्रतिमा होती.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर १९९९ मध्ये ते काही काळ त्या पक्षात गेले. मात्र विधानसभेची उमेदवारी घेऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. १९९९, २२०४, २००९ व १०१९ मध्ये ते विधानसभा सदस्य म्हणून विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते विद्यमान आमदार आहेत.
मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर आहे. सिन्नर शहर पाणीपुरवठा योजना, उपसा जलसिंचन योजना, समृद्धी महामार्ग, औद्योगिक वसाहतया माध्यमातून रोजगार निर्मीतीवर त्यांनी विशेष भर दिला. श्री कोकाटे यांनी काही काळ भारतीय जनता पक्षात काम केले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केली होती. त्यांना १,३४,२९९ मते मिळाली होती. यामध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघातून त्यांना सर्वाधीक ९१,११४ मते मिळाली होती.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.