Amruta Pawar
Amruta Pawar 
मुख्य बातम्या मोबाईल

अमृता पवारांच्या जि. प. गटात दहा कोटींचा होणार रस्ता

सरकारनामा ब्युरो

शिक  : परिसराच्या विकासकामांसाठी आग्रही पदाधिकारी असेल तर एखादा जिल्हा परिषद सदस्य देखील मोठे काम करु शकतो याचे उदाहरण म्हणजे देवगाव जिल्हा परिषद गटात दहा कोटींच्या रस्त्याला मिळालेली मंजुरी. राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या सदस्या आर्कीटेक्ट अमृता पवार यांनी यासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला. 

देवगाव (ता. निफाड) जिल्हा परिषद गटाच्या सदस्या आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सदस्य महासंघाच्या अध्यक्षा पवार यांनी आपल्या गटातील या रस्त्याच्या कामासाठी २०१८ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन याबाबतचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर त्यांनी खासदार डॅा भारती पवार यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा केला. या विकासकामासाठी भाजपच्या खासदार आणि राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या सदस्या या दोन्ही पवारांनी परस्परातील समन्वयातून या कामासाठी केलेला पाठपुरावा अखेर यशस्वी झाला. केंद्रीय भुपृष्ठवाहतूक मंत्रालयाने नुकत्याच मंजूर केलेल्या विविध कामांच्या यादीतया दहा कोटीं खर्चाचा हा रस्ता मंजूर केला आहे. लवकरच त्याची निविदा प्रक्रीया सुरु होऊन त्याच्या कामाला सुरवात होईल.   

कानळद ते देवगाव, भरवस फाटा (ता. निफाड) हे ० ते १४ /२०० किलोमीटर हा रस्ता विकासाचे काम केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजूर या रस्त्यासाठी दहा कोटींचा निधी अपेक्षित आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॅा भारती पवार यांच्या मतदारसंघात या परिसर समाविष्ट आहे. या रस्त्यामुळे निफाड तालुक्याचा येवला आणि कोपरगाव या तिन्ही तालुक्यातील नागरिकांची सोय होईल.
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT