rohit pawar
rohit pawar 
मुख्य बातम्या मोबाईल

रोहित पवारांच्या कार्यक्रमाला वीस आमदारांची उपस्थिती!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी  कर्जत-जामखेड या मतदारसंघाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या 'कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन'च्या कार्यक्रमाला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे असे एकूण वीस आमदार उपस्थित होते.

अभिनेते मिलिंद गुणाजी, प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, चित्रपट निर्मात्या दिपशिखा देशमुख आणि प्रसिद्ध कवी अरविंद जगताप सर यांच्या हस्ते या फाऊंडेशनेचे काल उदघाटन करण्यात आले. 

कर्जत-जामखेडच्या मातीत विकासाची प्रचंड क्षमता आहे, इथे अनेक उत्तम पर्यटन स्थळं आहेत. हे जगाला दाखवण्यासाठी एखाद्या व्यासपीठाची गरज होती, ते व्यासपीठ देण्याचा हा प्रयत्न असल्याचे रोहित यांनी या वेळी सांगितले. 'कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशनचा 'लोगो', कर्जत-जामखेडच्या पर्यटनाची माहिती देणाऱ्या वेबसाईटचं आणि 'आपलं कर्जत-जामखेड' या कर्जत-जामखेडच्या सांस्कृतिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक क्षेत्राची माहिती देणाऱ्या वेब सिरिजचंही या प्रसंगी उदघाटन करण्यात आलं. याशिवाय 'आयआयटी' पवई आणि 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स' (TISS) या दोन्ही संस्थांसोबत कर्जत-जामखेडच्यावतीने एकात्मिक संशोधनाचा करार करण्यात आला. त्यासाठी या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. 

या वेळी माजी मंत्री आमदार प्रकाश सोळुंके यांच्यासह विद्याताई चव्हाण, संजय जगताप, संदिप क्षीरसागर, संग्राम जगताप, शैलेश कदम, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, नितीन पवार, दिलीप बनकर, योगेश कदम, बाळासाहेब आजबे, झिशांत सिद्दीकी, दिलीप मोहिते, राजू नवघरे, सुनील टिंगरे, सुनील शेळके, डॉ. किरण लहामटे हे आमदार उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीबद्दल रोहित यांनी या सर्वांचे आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT