539 police sub-inspectors in the state have been promoted as assistant police inspectors
539 police sub-inspectors in the state have been promoted as assistant police inspectors  
मुख्य बातम्या मोबाईल

राज्यातील ५३९ फौजदारांना ‘एपीआय’पदाची लॉटरी

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : राज्यातील ५३९ फौजदार (पोलिस उपनिरीक्षक) आज पदोन्नती मिळून सहायक पोलिस निरीक्षक तथा एपीआय झाले आहेत. कोरोना महामारीच्या निराशाजनक गर्तेत ही आशादायक बातमी राज्य सरकारने देऊन एकप्रकारे या संकटाचा मुकाबला करणाऱ्या पोलिस दलाचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. 

राज्य पोलिस दलातील नियमित बदल्या आणि बढत्यांना सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत नुकतेच सहायक पोलिस (एसीपी) तथा पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर बदल्या करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर आज (ता. २८ एप्रिल) खुल्या प्रवर्गातील पीएसआयच्या बढतीवर बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात पिंपरी चिंचवड शहराला ११ नवे एपीआय मिळाले आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील १० फौजदार एपीआय झाले आहेत. त्यातील नऊ जणांची शहराबाहेर बदली झाली असून दोघांना पदोन्नतीवर शहरातच ठेवण्यात आले आहे.

पदोन्नती मिळालेले अधिकांश फौजदार मुंबई पोलिस दलातील आहेत. तेथील अनेक अधिकाऱ्यांना नक्षलग्रस्त भागात गडचिरोलीला पाठवण्यात आले आहे, तर दुय्यम म्हणजे साईड ब्रँचला असलेल्यांना फिल्ड पोस्टिंग दिली गेली आहे.

दरम्यान, राज्यातील १३ सहायक पोलिस आयुक्तांना (एसीपी) राज्य सरकारने ता. २३ एप्रिल रोजी बढती देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे ते पोलिस उपायुक्त (डीसीपी) झाले आहेत. त्यात पुण्यातील तिघांचा समावेश होता. खुल्या प्रवर्गातील जागांवर ही पदोन्नती देण्यात आलेली आहे. गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी पदोन्नतीवरील बदल्यांचा हा आदेश नुकताच काढला आहे.

पुण्यातील एसीपी वैशाली विठ्ठल शिंदे यांची लोहमार्ग, नागपूर येथे, वैशाली माने यांची अमरावती, तर डॉ. शिवाजी पवार यांची राज्य पोलिस अकादमी, नाशिक येथे बदली झालेली आहे.  
 
इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढील प्रमाणे 
१) अभय डोंगरे ः एसीपी (गुन्हे), सोलापूर शहर ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना
२) रूपाली दरेकर ः एसीपी (वाहतूक), सोलापूर शहर ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, औरंगाबाद
३) अनिता जमादार  ः अप्पर अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन, औरंगाबाद ते पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, औरंगाबाद
४) किशोर काळे ः पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), सांगली ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, धुळे
५) अमोल झेंडे  ः एसीपी (एसबी), नवी मुंबई ते पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे
६) प्रदीप जाधव  ः एसीपी (विभाग-1), नाशिक शहर ते अप्पर अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक
७) अशोक बनकर ः एसीपी(एसबी), औरंगाबाद ते अप्पर अधीक्षक, गोंदिया
८) रमेश धुमाळ ः अप्पर अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई ते सहाय्यक महानिरीक्षक (नि.व स.), पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई)
९) शोक थोरात ः उपविभागीय अधिकारी, पाटण उपविभाग, सातारा ते प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र अकोला.
१०) अशोक नखाते ः एसीपी, नाशिक शहर ते उप संचालक, डी.टी.एस. (गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय), नाशिक.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT