Abdul Sattar and Ekanath Khadase
Abdul Sattar and Ekanath Khadase 
मुख्य बातम्या मोबाईल

खडसे तुम्ही शिवसेनेत या; अब्दुल सत्तारांचे आवतण

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : एकनाथ खडसे हे भाजपचे बाहुबली नेते आहेत. ते संपणारे नेते नाहीत. ओबीसी समाजाला सोबत घेऊन अन्यायग्रस्त खडसेंनी शिवसेनेत यावे, त्यांना शिवसेनेत निश्चितच चांगले भवितव्य असेल, असे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे सांगितले.

औरंगाबाद तालुक्यातील पिसादेवी येथील ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण, विविध विकासकामांचे उद्घाटन शनिवारी झाले. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व सत्तार एकत्र होते. माझ्याविषयी षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप आज खडसे यांनी केला. हाच धागा पकडून सत्तार म्हणाले, 'खडसे यांच्यामुळेच भाजप-शिवसेनेची तुटलेली युती पुन्हा जुळली होती. ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते; मात्र त्यांच्यावर अन्याय झाला. कटप्पाने बाहुबलीला मारले, तसाच काहीसा प्रकार खडसेंबाबत झाला. आता ओबीसी समाजाला सोबत घेऊन खडसेंनी शिवसेनेत यावे. शिवसेनेला खडसेंसारख्या अनुभवी नेत्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करून आम्ही खडसेंना पक्षात आणण्याचा प्रयत्न करू.'

खडसेंची नाराजी दूर करू : दानवे
''एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यात भाजप वाढवण्यात त्यांचे योगदान आहे. राजकीयदृष्ट्या काही निर्णय घ्यावे लागतात. त्यात कोणी मागे जाते तर कोणी पुढे जाते. त्यातून एखाद्याला माघार घ्यावी लागली तर ती नाराजी समजू नये. राज्यातील अनेक नेत्यांना प्रसंग पाहून पुढे नेले जाते तसे थांबवलेही जाते. खडसे यांची नाराजी असेल, तर ती एकत्र बसून दूर केली जाईल,'' असे दानवे म्हणाले.

काल खडसे यांनी जळगावमध्ये बोलताना भाजपच्या नेत्यांवर तोफ डागली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टिका टिप्पणी करू शकत नाही. कारण आम्ही (देवेंद्र) सर्व तत्त्व, सत्व विसरून चार दिवसांचा संसार केला आहे. मुहूर्त साधला, लग्न केले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तीन, चार दिवस एकत्र राहिलो. चार दिवस दुसऱ्यांच्या घरात राहून तुम्ही पतिव्रता कसे राहू शकतात? टीकाटिप्पणी करू शकत नाही. कारण तुम्ही नैतिकता हरविली आहे, असा आरोप खडसे यांनी केला होता. 

माझ्या मुलीला विधानसभेत पाडण्यासाठी कोणी प्रयत्न केला, तेही पुरावे मी वरिष्ठांना दिले आहेत. माझा काही गुन्हा असेल तर शिक्षा करा, भ्रष्टाचार केला असेल, तर कडक शिक्षा करा, चूक झाली असेल तर ते सांगा. झोटिंग समितीचा अहवाल क्लीन असल्यावरही माझ्यावर अन्याय का? मी काय गुन्हा केला आहे? याची उत्तरे पक्षाकडे मी मागणार आहे. सध्या या षडयंत्रावर पुस्तक लिहित आहे. त्यात सर्व बाबी पुराव्यानिशी मांडणार आहे. कोरोना संसर्गानंतर सर्व वरिष्ठांना दाखवेन. तरीही कारवाई झाली नाही तर राजकीय क्षेत्रात पुढील पाऊल उचलणार आहे, असेही खडसे म्हणाले होते.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT