Pankaja Munde, Chandrasekhar Bavankule .jpg
Pankaja Munde, Chandrasekhar Bavankule .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजप ओबीसी मोर्चाच्या बैठकीकडे पंकजा, बावनकुळे फिरकले नाहीत...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजप (BJP) ओबीसी (OBC) मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज (ता. १९ जुलै) मुंबईमध्ये सुरु आहे. मात्र, या बैठकीला भाजप नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अनुपस्थित असल्याने मुंडे अजूनही नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, बावनकुळे यांच्या गैरहजेरीने भाजप कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत. (Absence of Pankaja Munde and Chandrasekhar Bavankule at the meeting of BJP OBC Morcha) 

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात भाजपने गेल्या महिन्यात पुकारलेल्या आंदोलनात पंकजा सहभागी झाल्या होत्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले होते. भाजपसाठी आजची कार्यकारिणी महत्वाची होती. तरीही पंकजा यांनी पाठ फिरविल्याने त्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात रंगली होती. आजच्या बैठकीला ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व केलेले आणि भाजपचे महत्त्वाचे ओबीसी नेतेच अनुपस्थित असल्याचे त्यांची चर्चा राज्यभर रंगली आहे. दोन्ही नेते बैठकीला अनुपस्थित असल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.  

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरु होती. मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांनी राजीनामे दिले होते. 

नाराज कार्याकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की ''राजीनामा मी नामंजूर करणे तथा तो तुम्ही मागे घेणे हा स्वल्पविराम असून तो पूर्णविराम नसल्याचे सूचक वक्तव्य पंकजा यांनी केले होते. मंत्रिपदासाठी तुम्हाला मी राजीनामा द्यायला लावेल का अशी विचारणा त्यांनी केली. आपले घर आपण का सोडायचे असंही त्या म्हणाल्या होत्या. दबाव तंत्रासाठी ही जागा छोटी असून त्याकरता मोठी जागा लागेल. त्याच बरोबर माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा असल्याचे त्या त्यावेळी म्हणाल्या होत्या.

मुंबई येथे आयोजित भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, खासदार संगम लाल गुप्ता, आमदार डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, माजी आमदार योगेश टिळेकर उपस्थित आहेत.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT