Accident at Malegaon Sugar Factory
Accident at Malegaon Sugar Factory 
मुख्य बातम्या मोबाईल

माळेगाव कारखान्याच्या टाकीत आठ कामगार गुदमरले 

सरकारनामा ब्युरो

माळेगाव ः माळेगाव (ता. बारामती) येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा यंदाच्या ऊस गाळप हंगामाची सांगता नुकतीच झाली. त्यानंतर यंत्रसामग्रीची स्वच्छता होत असताना शनिवारी अपघात झाला.

एका पॅन टाकीची स्वच्छता करत असताना गॅस तयार होऊन आठ कामगार गुदमरले. त्यामध्ये दोन कामगार बेशुद्ध अवस्थेत आहेत, त्यात रामभाऊ येळे (माळेगाव, ता. बारामती), जालिंदर भोसले (निरावागज, ता. बारामती) यांचा समावेश आहे. 

जखमी सर्व कामगारांवर बारामती शहरातील खासगी वैद्यकीय रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहेत. माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे, अनिल तावरे, योगेश जगताप, राजेंद्र ढवाण, स्वप्निल जगताप, मदनराव देवकाते, नितीन सातव, सुरेश खलाटे, दत्तात्रेय भोसले, बन्सी आटोळे, कार्यकारी संचालक विजय वाबळे आदींनी तातडीने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी व जखमी कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

घटनास्थळी कामगार बाळासाहेब ढमाळ, सुनील आटोळे आणि सोमा चव्हाण यांनी वेळीच जखमी कामगारांना मदत केल्याने मोठा अनर्थ टाळल्याचे सांगण्यात आले. 


माळेगावच्या जखमी कामगारांची नावे पुढील प्रमाणे : रामभाऊ येळे (माळेगाव), जालिंदर भोसले (निरावागज), राजेंद्र तावरे (सांगवी), सुनील पाटील (टेंभुर्णी, जि. सोलापूर), घनश्‍याम निंबाळकर (भिकोबा नगर- धुमाळवाडी), शशिकांत जगताप (पणदरे), शरद तावरे (सांगवी), प्रवीण वाघ (सांगवी). 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT