Actress Khooshboo Quits Congress
Actress Khooshboo Quits Congress 
मुख्य बातम्या मोबाईल

अभिनेत्री खुशबू यांचा काँग्रेसचा राजीनामा; भाजपमध्ये जाण्याची शक्यता

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दक्षिण भारतातील काँग्रेसचा चर्चेतला चेहेरा असलेल्या खुशबू सुंदर यांना पक्षाने प्रवक्ते पदावरुन तातडीने हटवले आहे. खुशबू सुंदर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पक्षातील काही ढुढ्याचार्यांबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे. 

खुशबू यांनी २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये (INC) प्रवेश केला होता. त्या आधी द्रवीड मुन्नेत्र कळघम (DMK)पक्षात होत्या. काँग्रेसने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली नव्हती आणि राज्यसभेवरही पाठविले नव्हते. त्यामुळे त्या नाराज असल्याचे बोलले जाते. दरम्यान, खुशबू भाजपमध्ये आल्या तर त्यांना २०२१ मध्ये भाजपची विधानसभेची उमेदवारी मिळू शकते, असे तामीळनाडू भाजपच्या सूत्रांनी सांगितले आहे. 

'मी पक्षात काही मिळविण्यासाठी आले नव्हते. जेव्हा काँग्रेसची सर्वात वाईट अवस्था होती त्यावेळी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपणाला समाजासाठी तळागाळात जाऊन काम करण्याची इच्छा होती. पण काँग्रेसमध्ये वरिष्ठ पदांवर असलेल्या काही ढुढ्ढाचार्यांमुळे हे शक्य झाले नाही. या व्यक्तींचा तळागाळातल्या लोकांशी संपर्क नाही. पण ते माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अडथळे निर्माण करुन बाजूला सारत आहेत,' असे खुशबू यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

कोण आहे खुशबू
खुशबू सुंदर या दक्षिणात्य अभिनेत्री आहेत. त्यांनी २०० पेक्षा जास्त चित्रपटांतून विविध भूमीका केल्या आहेत. त्यांना तामीळनाडू राज्याचा चित्रपट पुरस्कारक मिळाला आहे. बाॅलीवूडमध्येही त्यांनी काही चित्रपटांत कामे केली होती. अभिनेते जावेद जाफ्री यांच्याबरोबर त्यांनी मेरी जंग या चित्रपटात काम केले. त्यावेळी त्यांचे 'बोल बेबी बोल...राॅक अँड रोल...' हे गाणे गाजले होते. जॅकी श्राॅफ बरोबर त्यांनी 'जानू' या चित्रपटात मुख्य भूमीका केली होती. गोविंदा बरोबर त्यांनी तन-बदन चित्रपटात मुख्य भूमीका केली. अमीर खान आणि माधुरी दीक्षित यांच्या भूमीका असलेल्या दिवाना मुझ सा नही या चित्रपटातही त्यांची भूमीका होती. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT