मुख्य बातम्या मोबाईल

आदित्य ठाकरे म्हणतात, "" मी अजगर आणि पालीजवळ जाऊ शकत नाही ! '' 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ""आम्ही आमदार शोधतो आणि ते (भाऊ तेजस) पाली शोधतोय, त्याच्याप्रमाणे मी अजगर आणि पालीजवळ जाऊ शकत नाही,'' असे सांगत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वन्यप्राण्यांमध्ये रस असलेल्या तेजसचे कौतुक केले आहे. 

मुंबईत प्लॅस्टिक बंदीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी आपल्या लहान भावाला वन्यप्राण्यांच्या असलेल्या आवडीबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की त्यांनी आजवर अनेक शोध लावले आहेत. पर्यावरणाशी एकरूप कस व्हावं हे त्याच्याकडून मी शिकलोय पण अजगर आणि पालीच्या जवळ मी नाही जाऊ शकत.'' 

प्लॅस्टिकबंदीबाबत ते म्हणाले, गाव आणि शहरात प्लॅस्टिकबाबत त्रास असतो. राज्यात प्लास्टिक बंदी झाल्यापासून कचऱ्यात बदल झाले. प्लास्टिक बंदी देशात आणली तर खूप मोठा बदल होऊ शकतो. आपल्याकडे 20 राज्यात प्लास्टिक बंदी आहे. जर सगळ्या राज्यात प्लॅस्टिकबंदी केली तर नक्कीच याचा फायदा होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT