After 'Captain Kul' Dhoni, Raina also announced his retirement
After 'Captain Kul' Dhoni, Raina also announced his retirement 
मुख्य बातम्या मोबाईल

'कॅप्टन कुल' धोनी पाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा 

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : कपिलदेव यांच्यानंतर भारताला दुसऱ्यांदा विश्‍वचषक मिळवून देणारा "कॅप्टन कुल' अर्थात महेंद्रसिंह धोनी याने आज स्वातंत्र्य दिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना धक्का दिला. आयपीएलसाठी दुबईला उड्डाण केलेल्या धोनीने इन्स्टाग्रामवरून निवृत्तीची घोषणा करताच चेन्नई सुपर किंग संघातील त्याचा सहकारी सुरेश रैनानेही तडकाफडकी निवृत्ती घोषित केली. 

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो आयपीएल खेळत राहणार आहे. कसोटी क्रिकेटमधून त्याने यापूर्वीची निवृत्ती जाहीर केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करून धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. "तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद, आज सायंकाळी 7. 29 वाजल्यापासून मला निवृत्त समजलं जावं' असे पोस्टमध्ये धोनीने म्हटले आहे. 

सौरभ गांगुलीनंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. भारताला आयसीसीच्या दोनही प्रकारांतील विश्‍वचषक स्पर्धांचे जेतेपद मिळवून दिले आहे. याशिवाय कसोटीमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवून दिले होते. आतापर्यंतच्या भारताच्या सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचे नाव घेतले जाते. त्याचा हेलिकॉप्टर शॉट जगातील क्रिकेटरसिक कधीही विसरू शकणार नाहीत. 

जगातील बेस्ट फिनिशर म्हणून आजही धोनीचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या अनेक सामन्यांमध्ये धोनीने सिक्‍सर मारून, भारताला विजय मिळवून दिले आहेत. त्याने 2011 मध्ये वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात खेचलेला षटकार तमाम भारतीयांच्या स्मरणात कायम राहील. याशिवाय विकेटकिपर म्हणून त्याची कारर्कीद गौरवपूर्ण शब्दांत व्यक्त करावी, अशीच आहे. 

दरम्यान, महेंद्रसिंह धोनी याने भारताला पन्नास षटकांच्या स्पर्धेचे विश्‍वविजेतेपद 2011 मध्ये तर 2007 या वर्षी पहिल्याच टी- ट्‌विण्टी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले होते. त्याने अनेक उदयोन्मुख खेळाडूंना संधी दिली. पुढे त्यांनी धोनीने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरविला. 

महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याचा चेन्नई सुपर किंग संघातील सहकारी सुरेश रैना याने तडकाफडकी क्रिकेटला अलविदा केला आहे. रैना याही काही वर्षापासून भारतीय क्रिकेट संघाच्या बाहेर होता. तो सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT