Sarkarnaa Banner (13).jpg
Sarkarnaa Banner (13).jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

मुकुल रॅायनंतर आता एक खासदार, तीन आमदार भाजप सोडणार..

सरकारनामा ब्युरो

कोलकात्ता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. काल भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॅाय यांनी तृणमूल कॅाग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. त्याला काही तास झाल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  बंगालमधील भाजपचे एक खासदार आणि तीन आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारी असल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. after mukal roy bjp will face another blow west bengal three mla leaving party including one mp  

बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलविलेल्या बैठकीला खासदार शांतनू ठाकूर, आमदार विश्वजीत दास( बगडा), अशोक कीर्तनिया (बोनगाव उत्तर), सुब्रत ठाकूर (गायघाटा) हे अनुपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या भूमिकेबाबत हे नाराज असल्याची चर्चा आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार मुकुल रॉय (Mukul Roy) यांची काल घरवापसी झाली आहे. 

रॉय यांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला. यानंतर बोलताना त्यांनी भाजपला लक्ष्य केले.  रॉय यांनी ममतांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ममता आणि त्यांचे भाचे व तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय आणि त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांचा पक्षप्रवेश झाला. 

मुकुल रॅाय यांना भाजपमध्ये धमक्या मिळत होत्या. त्यामुळे त्यांची प्रकृतीही खालावली होती. ते आता पक्षात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत, असं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेल्या गद्दारांना पक्षात परत घेणार नसल्याचं देखील ममता बॅनर्जी यांनी सांगितलं होतं.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहारातील आरोपी मेहुल चोकसी याचा जामीन अर्ज डोमिनिकाच्या उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली त्याला जामीन दिला तर तो पळून जाईल म्हणून त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.  न्यायालयाने चोक्सीला फ्लाइट रिस्कच्या कारणावरून जामीन देण्यास नकार दिला. बचाव पक्षाच्या वकिलांकडून युक्तीवाद करण्यात आला की, एक कैरिकॉम नागरिक म्हणून मेहुल चोक्सीला जामीन मिळायला हवा. कारण, कथित अपराध हा जामीनपात्र आहे व त्यावर काही हजार रुपयांचा दंड भरत आहे.

Edited by : Mangesh Mahale  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT