sharad-pawar and vithoba lande
sharad-pawar and vithoba lande 
मुख्य बातम्या मोबाईल

तुमच्या वडिलांचे वय १०२ आहे? त्यांना भेटलच पाहिजे : पवारांनी विलास लांडेंशी साधला संवाद

विलास काटे

आळंदी :  काय? तुमच्या वडिलांचे वय १०२ आहे! पुढच्या वेळी मला वडिलांची भेट घेण्यासाठी घेवून जा, असे सांगत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्याशी जुन्या आठवणी जाग्या केल्या.

``मला आठवतेय ते. माझी पहिली निवडणूक होती आणि तुमच्या घराच्याबाहेर ओटा असायचा. त्यावर तुमचे वडिल बसलेले असायचे. आजूबाजूला आणखी काही लोक बसलेली असत. मला माझ्या राजकारणात तुमचे वडिलांनी भक्कमपणाणे साथ दिली, अशी आठवण शरद पवार यांनीी लांडे यांना सांगितली. 

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या मातोश्री इंदूबाई विठोबा लांडे यांचे नुकतेच ९३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या सांत्वनासाठी पवार यांनी लांडे यांना फोन केला होता. विलास लांडे यांचे वडिल विठोबा लांडे हे सध्या १०२ वयाचे असून ते घरीच असतात. विठोबा लांडे वारकरी संप्रदायातील आणि कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ल समजले जात. त्याचप्रमाणे पिंपरी महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्वही केले. आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्यात डांगे पंच दिंडीत ते अनेक वर्षे पायी चालले. वारकरी संप्रदायाचा वारसा चालवित लांडे घराण्याने राजकारणातही नाव कमावले.

लांडे यांचे वडिल पवार साहेबांचे पूर्वीपासून समर्थक राहिले. याची आठवण करून खुद्द पवार साहेबांनीच श्री. लांडे यांना करून दिली. पवार साहेब म्हणाले, तशी तुमच्या घरात सर्वांचीच तब्येत चांगली आहे. तुमचे वडिलही चांगले आहेत. मला  आठवतेय ते. माझी पहिली निवडणूक होती. आणि तुमच्या घराच्या बाहेर ओटा असायचा. त्यावर तुमचे वडिल बसलेले असायचे. आजूबाजूला आणखी काही लोक बसलेली असत. मला माझ्या राजकारणात तुमचे वडिलांनी भक्कमपणे साथ दिली.

यावर विलास लांडे म्हणाले, ``आजही माझे वडिल तुमचीच पुजा करतात.दररोज देवघरात तुमची पूजा होते. यावर पवार साहेबांनी पुढच्यावेळी मला वडिलांची भेट घेण्यासाठी घेवून जा, असे आवर्जून लांडे यांच्याकडे वडिलांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. पवार साहेबांच्या शब्दाने लांडे यांनाही गहिवरून आले.

याबाबत बोलताना श्री लांडे यांनी सांगितल की,पवार साहेब म्हणजे देशातला मोठ्या मनाचा माणूस असून सर्वसामान्यांशी नाळ असणारा आणि गोरगरिबांपर्यंत पोचणारे नेतृत्व आहे. प्रत्येकाच्या सुखदुखात आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी आपलसं वाटावी अशी त्यांची  कार्यकर्त्यांच्या पाठीवरती सातत्याने थाप असती. वडिलांच्यानंतर जी माणस असतात. ते म्हणजे पवार साहेब! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT