Ajit Pawar
Ajit Pawar 
मुख्य बातम्या मोबाईल

अजित पवार सिल्व्हर ओकला पोहोचले? काय होणार पुढे?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेले माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार मुंबईत शरद पवार याच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहे. त्यांचे बंधू श्रीनिवास पवार काही काळापूर्वी सिल्व्हर ओक येथे गेले आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्यात चर्चा होणार असून त्यातून काय निष्पन्न होणार, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. 

काल अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मुंबई येथील कार्यालयात त्यांनी तो सूपूर्त केला होता. त्या कार्यलयाने बागडे यांना तो मेलद्वारे पाठविला. अजित पवार हे बागडे यांच्याशी बोलले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा का दिला याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे. 

दरम्यान पवार कुटंबात कुठलेही वाद नसल्याचे स्पष्टीकरण काल शरद पवार यांनी पुण्यात दिले होते. मात्र, अजित पवार यांनी राजीनामा देताना पवार यांच्याशीही चर्चा केली नव्हती. अजित पवार यांच्या राजीनाम्याची कल्पना शरद पवार यांनाही नव्हती. काल सायंकाळपासून अजित पवार यांच्याशी संपर्क होत नव्हता. मात्र, काही वेळापूर्वी अजित पवार सिल्वर ओक येथे पोहोचले आहेत, या चर्चेतून काही सकारात्मक निघेल अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. अजित पवार यांच्यासमवेत धनंजय मुंडेही होते. मात्र, आतमध्ये केवळ पवार कुटुंबियांतच चर्चा होणार आहे. त्यामुळे अन्य नेते सिल्व्हर ओकच्या बाहेरच आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT