Ajit pawar.jpg
Ajit pawar.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

अजितदादा म्हणाले, `तुम्हाला नक्की एचआरसीटी मशिन देईन`

शांताराम काळे

अकोले : जिल्ह्यातील कोरोना (Corona) रुग्ण वाढतच आहेत. अकोले सारख्या दुर्गम भागात ती संख्या झपाट्याने वाढत असल्याने अकोल्यातील (Akole) भूमिपूत्र असलेल्या अधिकाऱ्यांनी मंत्री, अधिकाऱ्यांना गळ घातली आहे. (Ajitdada said, "I will definitely give you an HRCT machine.")

यावर मंत्र्यांनी हेल्थ कमिश्नर यांना पुढील कारवाईचे आदेश दिले. तसेच अजित पवार यांनी, मी नक्की तुम्हाला एचआरसीटी मशीन उपलब्ध करून देईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे अकोले तालुक्यातील रुग्णांची गैरसोय दूर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

लुक्यातील रुग्णांना एचआरसीटी या तपासणीसाठी इतर तालुक्यात जावे लागते. प्रसंगी नगरला जावे लागते. ही गैरसोय दूर होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अकोल्यातील रुग्णांना संगमनेर, लोणी, नाशिक, नगर येथे जाऊन ही तपासणी करावी लागे. त्यात रुग्णांना खूप त्रास होतो. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्याचे नगरविकास विभागाचे उपसचिव विजयराव चौधरी, महाराष्ट्र राज्याचे महसूल विभागाचे उपसचिव अजित देशमुख, यांनी ही बाब पत्राद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या लक्षात आणून दिली.

हेही वाचा...

तालुक्यात वाढत चाललेली करोनाची भयावह स्थिती, उपचार व औषधोपचारांनी आर्थिक बेजार झालेली जनता आणि रोगनिदानास लागलेल्या विलंबामुळे प्राणास मुकणाऱ्या जनतेसाठी आता भुमीपुत्र असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच प्रयत्न सुरु केले आहेत.

अकोले तालुक्यातील 191 गावांमध्ये 7 लाख इतकी लोकसंख्या आहे. तालुका आदिवासी बहुल लोकसंख्येचा आणि डोंगराळ असल्याने दळणवळण आणि आरोग्य सुविधा मिळणे अडचणीचे आहे. कोव्हिड 19 च्या परिस्थितीत रुग्णांना सी.टी.स्कॅन व डीजिटल एक्स-रे संगमनेर किंवा लोणी शिवाय सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच अकोलेत एकही खासगी सुसज्ज रुग्णालय नसल्याने रोगनिदानास उशीर होऊन लोकांना प्राणास मुकावे लागते.

अकोलेतील लोकांच्या आरोग्य सुविधेसाठी अकोले, कोतुळ, राजुर, समशेरपूर ग्रामीण रुग्णालयात सी.टी.स्कॅन व सी.आर. सिस्टिम त्वरीत उपलब्ध करुन देण्याची विनंती अजित देशमुख, विजय चौधरी आणि संजय देशमुख या प्रशासकीय अधिका-यांनी केली आहे.

कोरोनाच्या गंभीर पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील जनता हवालदिल झालेली असताना तालुक्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी मिळून स्वत:च्या खर्चाने सुगाव येथे 60 ऑक्सिजन बेडचे करोना केंद्र सुरु केले. आता वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांनीही यात लक्ष घातल्याने तालुक्यातील रुग्णांसाठी शाश्वत स्वरुपाचे काम होईल, याची नक्की शाश्वती आहे.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT