Akola Ex Mla Tested Corona Positive
Akola Ex Mla Tested Corona Positive 
मुख्य बातम्या मोबाईल

अकोल्याचे 'हे' माजी आमदार निघाले कोरोना पाॅझिटिव्ह

सरकारनामा ब्युरो

अकोला :  कोरोनाच्या साथीमुळे आणि वाढत्या संख्येमुळ सगळे लोक भयभीत आहेत.  त्यातच लाॅकडाऊनच्या काळात सामान्य माणसांना मदत करण्यासाठी अनेक हात अकोल्यात सरसावले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ जगन्नाथ ढोणे त्यात अग्रेसर होते. मात्र, रविवारी सकाळी ते कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे.

कोरोनाच्या संकटात व लाॅकडाऊनच्या काळात त्यांनी लोकांना बरीच मदत केली.  किमान दहा हजार मास्कचे त्यानी वाटप केले. तेवढ्चाय संख्येने आयुर्वेदिक काढ्याच्या बाटल्याही त्यांनी वाटल्या होत्या. दहा हजार मास्क आणि तेवढाच आयुर्वेदिक काढा  वाटला आहे. वास्तविक त्यांनी आपल्या संस्थेकडून पीएम केयर आणि सीएम केयर फंडामध्ये देणगी देण्याचे ठरवले होते. पण मास्क निर्मिती करून त्यांचे वाटप करावे, असा आग्रह त्यांच्या मित्रमंडळींनी केला होता. 

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आयुर्वेदिक काढ्याचे वितरण त्यांनी सुरु केले होते. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते एप्रिल महिन्यात मास्क वितरणाचा शुभारंभ केला होता.  याच काळात कोरोनाने त्यांना गाठले असावे. डॉ. ढोणे हे स्वतः एम. एस. सर्जन आहेत. ‘आम्ही युवाराष्ट्र’च्या माध्यमातून ते गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना विषयी जनजागृती करीत आहेत. दरम्यान, डॉ जगन्नाथ ढोणे यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ते लवकरच या संकटातून मुक्त होतील अशी प्रार्थना त्यांच्या चाहत्यांनी केली आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT