Alalka Kubal
Alalka Kubal 
मुख्य बातम्या मोबाईल

अलका कुबल यांनी प्रचार केलेल्या पॅनेलला बहुमत

भारत नागणे

पंढरपूर : मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल या आता राजकारणातही वरचढ ठरल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी त्यांनी  स्टार प्रचारक म्हणून काम केलेलं पॅनल बहुमतांनी निवडून आलं आहे.  

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी बाजी मारली आहे. निडणुकी दरम्यान विजयासाठी अनेक राजकीय मातब्बरांनी प्रचारात आघाडी घेतली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक प्रश्न आणि समस्यांची चर्चा न करता, देश आणि राज्य पातळीवरील प्रश्नांनाच अधिक महत्व देत नेत्यांनी निवडणुक प्रचार केला. परंतु याला अपवाद ठरली ती पंढरपुरातील नारायण चिंचोली ग्रामपंचायत.

येथे निवडणुक प्रचारासाठी चक्क अभिनेत्रींनाच प्रचारण  करण्यात आले होते. येथे एका गटाने प्रसिध्द नृत्यांगना आणि टीव्ही अभिनेत्री माधुरी पवार यांना प्रचारासाठी बोलावले होते. अभिनेत्री माधुरी पवार यांनी गावातून रोड शो करत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केलं होतं. त्यानंतर विरोधी परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनीही प्रचार संपण्याच्या एक दिवस आधी माधुरी पवार हिला टक्कर म्हणून  माहेरीची साडी फेम अभिनेत्री अलका कुबल यांना चक्क गावात आणून त्यांनाच प्रचारात उतरवले होते. त्यानंतर येथील निवडणुक निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

काल निकाल जाहीर होताच, ज्येष्ठ अभिनेत्री अकला कुबल यांनी  प्रचार केलेल्या परिचारक गटाचे पॅनल बहुमातांनी विजय झालं. यामध्ये नृत्यंगना माधुरी पवार यांच्या  पेक्षा जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी केलेला प्रचारच निर्णयाक ठरला. येथील निवडणूक निकालानंतर आता   मराठी चित्रपट क्षेत्रात सरस असलेल्या अलका कुबल आता राजकारणात ही वरचढ ठरल्याची चर्चा चित्रनगरीत सुरु  झाली आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT