Ajit Pawar (13).jpg
Ajit Pawar (13).jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

गणेश विसर्जनाच्या दिवशी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व दुकाने बंद राहणार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गणेश विसर्जनाच्या (Ganesh Immersion), दिवशी रविवारी (ता. १९) पुणे, (PUNE), पिंपरी चिंचवड शहर (PCMC),आणि कॅन्टोनमेंट क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सुरू राहतील. तसेच, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, परिस्थिती आटोक्यात आल्यास येत्या दोन ऑक्टोबरला बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित (Ajit pawar), पवार यांनी दिली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी कोरोना उपाययोजना संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील या वेळी उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, सध्या कोरोना  बाधित रुग्ण आणि मृत्यू दरात घट झाली आहे. रुग्ण वाढीचा दर 0.05 टक्क्यांवर आला आहे. शहर आणि जिल्ह्यात आजअखेर 93 लाख नागरिकांना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. या सप्टेंबर महिन्यातही 19 लाखांचा टप्पा ओलांडण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे.

णे जिल्ह्यात 77 टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर, 41 टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये बाधित होण्याचे प्रमाण हे 0.030 टक्के इतके आहे. गणेश विसर्जनाच्या  दिवशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT