Shivsena (18).jpg
Shivsena (18).jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

शिवसेना नेत्यांचा आपल्याच नगराध्यक्षांवर विश्वास नाय!

सरकारनामा ब्यूरो

मालवण : मालवण शहरात (Malvan City) मूलभूत सुविधांबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहराची बिकट अवस्था असतांना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर (Mahesh Kandalgaonkar) मुख्याधिकारी संतोष जिरगे हे न झालेल्या कामांची बिले काढण्यात मग्न आहेत. नगराध्यक्षांवर त्यांच्याच शिवसेना (Shivsena) पक्षातील नेत्यांचा विश्‍वास राहिला नाही. कामाअभावी नगराध्यक्षांनी शहरातील शिवसेना संपविण्याचे काम केले असल्याची टीका उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी आज (ता. १७) येथे पत्रकार परिषदेत केली.

येथील पालिकेत उपनगराध्यक्ष वराडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी भाजपचे गटनेते गणेश कुशे उपस्थित होते. वराडकर म्हणाले, "शहरात कचऱ्याचे ढीग पसरले असून कचर्‍याच्या गाड्या नाहीत, माणसे नाहीत अशी उत्तरे स्वच्छता मुकादम देत आहेत. माणसे पुरविण्याची जबाबदारी कोणाची ? ती पूर्ण करत नसेल तर कारवाई का होत नाही? ऑर्डरपेक्षा माणसे कमी येत असतील तर ठेकेदारावर कारवाई करणे हे मुख्याधिकार्‍यांचे काम आहे. मात्र ठेकेदारांची बिले व्यवस्थित पूर्ण होतात.

वराडकर म्हणाले,  तीन वर्षांपूर्वी कचर्‍याच्या नवीन पाच गाड्या घेतल्या, त्या आज बंद पडल्या आहेत. गणेशोत्सव काळातही शहरात कचर्‍याचे नियोजन नाही. देऊळवाडा येथे गणेश विसर्जन ठिकाणी पालिकेने गाळ काढून तिथेच टाकला. चतुर्थीपूर्वी गाळ काढण्याची कामे का झाली नाहीत.

नगराध्यक्ष आणि प्रशासनाने चतुर्थीपूर्वी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून काम तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले त्याचे काय झाले? आदेश देऊनही प्रशासन त्यांना किंमत देत नसेल तर नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे ? कचर्‍याची उचल नाही, पथदिवे बंद, अग्निशमन बंद, डास प्रतिबंधक फवारणी नाही, अधिकारी बदली होऊन गेले त्यांच्या जागी नवे अधिकारी नाही.

तसेच, शहरात कोणत्याही गोष्टीचे नियोजन नाही. आंधळ दळतय कुत्र पीठ खातय अशी अवस्था झाली आहे, या सर्वाला नगराध्यक्ष व मुख्याधिकारी जबाबदार आहेत. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी दोघेही न झालेल्या कामांची बिले काढण्यात मग्न आहेत. कामे झाली नाही तरी चालतील ठेकेदार जगले पाहिजेत हीच त्यांची भूमिका आहे. कामांच्या बिलांवर अकाउंटटने सह्या करण्यापूर्वी मुख्याधिकारी स्वाक्षर्‍या करतात याचे कारण काय? असा प्रश्‍नही वराडकर यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT