prajakt tanpure.jpg
prajakt tanpure.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपने बंद केलेली ही योजना आघाडी सरकारने सुरू करून आदिवासींना न्याय दिला

सरकारनामा ब्युरो

तिसगाव : मागील सरकारच्या काळात बंद करण्यात आलेली आदिवासी खावटी विकास योजना महाविकास आघाडी सरकारने पुन्हा सुरू करून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील साडेअकरा लाख आदिवासी समाज बांधवांना रोख रकमेसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. (The government gave justice to the tribals through khawti)

पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे खावटी आदिवासी योजनेअंतर्गत सुमारे दोनशेहून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप मंत्री तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, बानेश्वर दूध संस्थेचे अध्यक्ष रोहिदास कर्डिले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेना नेते रफिक शेख, मार्केट कमिटीचे संचालक माणिकराव लोंढे, सरपंच जगन्नाथ लोंढे, उपसरपंच गोपीचंद गरधे, ग्रामपंचायत सदस्य सोन्याबापु लोंढे, सुरेश बफें,सरपंच आदिनाथ सोलाट, भागिनाथ गवळी, एकनाथ झाडे, युवानेते जालिंदर वामन उपस्थित होते.

उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना मंत्री तनपुरे म्हणाले, की मागील सरकारने बंद केलेली आदिवासी खावटी विकास योजना महाविकास आघाडी सरकारने पुन्हा सुरू करून कोरोना महामारीच्या काळामध्ये या आदिवासी समाजातील गरीब गरजू कुटुंबांना दोन हजार रुपयांचे जीवनावश्यक साहित्य वाटप व दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून या महामारीत या समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच आदिवासी समाजातील तरुणांना जात पडताळणीच्या प्रमाणपत्रसाठी मोठी धावपळ करावी लागते, त्यासाठी तहसीलदार प्रांताअधिकारी यांची गाव पातळीवर बैठक बोलावून स्थळ पाहणी करून या तरुणांना जात पडताळणीचे प्रमाणपत्र देण्याचे देखील नियोजन केले जाणार असल्याचे मंत्री तनपुरे म्हणाले.

मुले शिक्षण प्रवाहात आणा

आपल्या मुलाबाळांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणा. त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करा. त्यांच्याबरोबर तुमचे देखील भविष्य उज्वल झाल्याशिवाय राहणार नाही, असे तनपुरे म्हणाले.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT