tihar
tihar 
मुख्य बातम्या मोबाईल

अंबानी स्फोटक प्रकरणातील संदेश तिहार परिसरातून

अनिश पाटील

मुंबई :  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक ठेवल्याची जबाबदारी स्वीकारणारा "जैश-उल-हिंद' या संघटनेच्या नावाने आलेला टेलिग्राम संदेश हा तिहार कारागृह परिसरातून आल्याचे सायबर तपासणीत निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलिस सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. या संदेशात खंडणीसाठी दिलेली बिटकॉईनची लिंकही अस्तित्त्वात नसल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

'पिक्‍चर अजून बाकी आहे', अशा शब्दात या संघटनेच्या वतीने जबाबदारी स्वीकारत असल्याचे म्हटले होते. एका टेलिग्राम मेसेजच्या माध्यमातून जैश-उल हिंदने दावा केला होता. त्यात स्फोटके ठेवणारे दहशतवादी सुखरुपपणे घरी पोहोचले आहेत. हा केवळ ट्रेलर होता आणि पूर्ण पिक्‍चर अजून बाकी आहे. यात मुकेश अंबानी यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी देण्यात आलेली बिटकॉईनची लिंकच बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते. 

या संदेशानंतर सायबर तज्ज्ञांच्या मदतीने या टेलिग्राम संदेशाची तपासणी करण्यात आली असून तो तिहार कारागृह आणि आसपासच्या परिसरातून पाठवण्यात आल्याचे तांत्रिक तपासणीत निष्पन्न झाले. या संदेशानंतर संघटनेच्या वतीने या प्रकरणातील सहभागाचे खंडन करणारी पोस्ट व्हायरल झाली होती. त्यात आपले हे कृत्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे याच जैश-उल-हिंदने दिल्लीत इस्त्रायल दुतावासाबाहेर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पण पुढे याप्रकरणी तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी याप्रकरणामागे दहशतवादी हात नसल्याचे म्हटले होते.

संशयित कारचा शोध
संशयित कार सापडल्याचा दावा करण्यात येत असला, तरी पोलिसांकडे याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. दरम्यान स्कॉर्पिओ कारसह अंबानी यांच्या घराजवळ आलेली संशयीत इनोव्हा कार पालघर जिल्ह्यातून एनआयएला सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. ती तपासणीसाठी एटीएस कार्यालयात आणण्यात आली होती. पण एटीएसच्या अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT