Amruta Fadanavis
Amruta Fadanavis 
मुख्य बातम्या मोबाईल

अमृता फडवीसांना १०० वर्षांची कुठली बजेट दिसली....ट्वीटकऱ्यांचा सवाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या १०० वर्षात देशात मांडले गेले नसेल असा अर्थसंकल्प मांडला, या अमृता फडणवीस यांच्या विधानावरून नेटकरी त्यांना चांगलेच ट्रोल करत आहेत. देशाला स्वातंत्र मिळून ७३ वर्षे झाली, मग तुम्हाला शंभर वर्षांची बजेट कुठे दिसली असा सवाल ट्वीटरवरुन केला जातो आहे. 

काल निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यावर ट्वीट करुन सीतारामन यांची स्तुती केली. नेमकी हीच स्तुती त्यांना अडचणीची ठरली आहे. गेल्या शंभर वर्षांत मांडले गेले नाही, असे बजेट काल मांडले गेले. अतिरिक्त कर न लादता विकासाला चालना देता येते हे आता साऱ्या जगाला दिसेल, असे ट्वीट अमृता यांनी करत निर्मला सीतारामन यांचे आभार मानले. नेटकऱ्यांनी ही संधी उचलत त्यांना ट्रोल करणे सुरु केले. 

मामी आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली नाहीत..आणि तुम्ही म्हणताय १०० वर्षांतले चांगले बजेट आहे. नेमक चुकतंय कोण...??
कदाचित आम्हालाच चुकीचा इतिहास शिकवला असेल. तुमचं बरोबर आहे मामी.. बजेट वरती एखाद गाणं येऊद्या....असे एका नेटकऱ्याने हिणवले आहे. तर......आपण नक्की भारतीय आहात का..? आपल्या ह्या विधानावरून हा प्रश्न उपस्तीत होतो.. भारत स्वतंत्र होऊन ७३ वर्ष झाली आणि ह्यांनी १०० वर्षांतील कोणते बजेट पाहिले आहेत.. ह्यांनी जनतेला पागल बनवायचा धंदा सुरू केला आहे वाट.. न्हवरा जनतेला गाजर दाखवतो आणि ही बाई जनतेला जोक्स सांगते..असे ट्वीट आणखी एकाने केले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT