Tatkare--oath-ceremony.
Tatkare--oath-ceremony. 
मुख्य बातम्या मोबाईल

विधानपरिषदेत सुनील तटकरे - अनिकेत तटकरे ही पिता-पुत्राची जोडी एकत्र आली

सरकारनामा

मुंबई  : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्रधिकारी संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेलेले नवनिर्वाचित सदस्य अनिकेत तटकरे यांनी शनिवारी विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्यांना शपथ दिली.

विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, माजी मंत्री सुनील तटकरे, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार हेमंत टकले, विद्या चव्हाण, माजी मंत्री नवाब मलिक तसेच मुंबई, रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे हे शिवसेनेचे उमेदवार राजीव साबळे यांचा पराभव करून विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेत आता सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे ही पिता-पुत्राची जोडी एकत्र काम करताना दिसेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT