anil deshmukh to meet sharad pawar
anil deshmukh to meet sharad pawar 
मुख्य बातम्या मोबाईल

गृहमंत्री झाल्यानंतर अनिल देशमुख पहिल्यांदा शरद पवारांना भेटणार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गृहखाते मिळाल्यानंतर अनिल देशमुख हे पहिल्यांदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी (ता. 6 जानेवारी) रोजी बारामतीत जाऊन भेट घेणार आहेत.

राज्याच्या मंत्रिमंडळाचे अधिकृत खातेवापट आज जाहीर झाले. त्यानंतर देशमुख यांच्याकडे हे खाते आले. शरद पवार यांनी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.

ते सोमवारी दिनांक 6 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा (सर्किट हाऊस) आहेत. . दुपारी 12.30 वाजता पुणे येथून मोटारीने बारामती, जि. पुणे कडे प्रयाण. दुपारी 3 वाजता बारामती, जि.पुणे येथे आगमन व राखीव. सोयीनुसार पुणेकडे प्रयाण. रात्री सर्किट हाऊस, पुणे येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार दिनांक 7 जानेवारी,2020 रोजी सकाळी 7.25 वाजता विमानाने नागपूरकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा आहे.

माळेगवा कारखान्याशी संबंधित एका संस्थेच्या कार्यक्रमाला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दोघांचीही देशमुख यांची भेट घेणार आहेत.

गृहखाते कोणाला मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीतील काही बडे नेते यासाठी आग्रही होते. मात्र ते विदर्भाच्या वाट्याला आले आहे. अनिल देशमुख यांच्यासाठीसुद्धा ही मोठी बाब मानली जाते. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाला विश्वासात न घेता फडणवीस यांच्यासोबत पहाटेची शपथ घेतली होती. त्या वेळी देशमुख यांनी विदर्भातील राष्ट्रवादीचे आमदार पक्षासोबत ठेवण्याची काळजी घेतली होती. तसेच शरद पवारांना साथ देण्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT