Chitra Wagh,  Chandrakant Patil .jpg
Chitra Wagh, Chandrakant Patil .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

चित्रा वाघ यांच्यावर भाजपची आणखी एक मोठी जबाबदारी 

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी वाघ यांना देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून वाघ यांना देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीविषयी कळवले आहे. (Another big responsibility of BJP on Chitra Wagh)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाघ यांनी अनेक वर्षे काम केले. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, 2019 च्या  विधानसभेच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपनेही त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यातच आता पुन्हा एक जबाबदारी देण्यात आली आहे.  

चंद्रकांत पाटील यांचे पत्र

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी मोठ्या जिद्दीने आणि अत्यंत कुशलतेने पार पाडत आहात. गेली अनेक वर्ष आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहात. युवती व महिला यांच्या विषयातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन आपल्याकडे ''भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी'' म्हणून विशेष जबाबदारी सोपविण्यात येत आहे. आगामी काळात आपण आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल व त्याचा संघटनेला निश्चित फायदा होईल, असा मला विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशने माझी भाजपा महाराष्ट्र–युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. तर चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

 Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT