Riyazuddin Kazi
Riyazuddin Kazi 
मुख्य बातम्या मोबाईल

एनआयएने अटक केलेला API रियाझ काझी पोलिस दलातून निलंबित

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अँटिलिया बाँब प्रकरणात पुरावे नष्ट केल्या प्रकरणात अटक करण्यात आलेला सहाय्यक पोलिस निरिक्षक रियाझ काझी याला पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. काल न्यायालयाने काझीला एनआयए कोठडी सुनावली आहे. काझी सध्या सशस्त्र पोलिस दलात कार्यरत होता. Arrested API From Mumbai Police Riyaz Kazi Suspended

सचिन वाझे प्रकरणात एनआयएने NIA मुंबई पोलिसांच्या Mumbai Police क्राईम इंटिलिजन्स युनिटचा CIU सहाय्यक निरिक्षक रियाज काझीला काल अटक केली. अँटिलिया बाँब प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा रियाझ काझीवर आरोप आहे. रियाज काझी याची अनेक दिवसांपासून एनआयए कार्यालयात तासनतास चौकशी सुरु होती. रियाजसह अनेक अधिकाऱ्यांचीही एनआयए चौकशी करत आहे. CIU Officer Riyaz Kazi Arrested by NIA in Sachin Waze Case

रियाज काझी हा ज्या सीआययू विभागात काम करत होता, त्याचे नेतृत्व सचिन वाझे Sachin Waze करत होता. एनआयएने या संपूर्ण कार्यालयाची झडतीही घेतली होती. सचिन वाझेला अटक झाल्यानंतर एनआयएचे अधिकारी रियाज काझीला बोलावून वारंवार त्याच्याकडे चौकशी करत होते. अखेर त्याला अटक करण्यात आली. 
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT