Asha Bhosale
Asha Bhosale 
मुख्य बातम्या मोबाईल

आशा भोसले यांनी सुमधुर आवाजाने सर्वांना मोहिनी घातली

सरकारनामा ब्युरो

नाशिक : आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना मोहिनी घालणाऱ्या ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. आशा भोसले या असामान्य प्रतिभेच्या धनी आहेत. त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने सर्वांना घातली. पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी श्री भुजबळ म्हणाले की मंगेशकर कुटुंबीय हे सर्वार्थाने महाराष्ट्राला लाभलेले रत्न आहेत. मंगेशकर कुटुंबातील महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळवणाऱ्या आशाताई ह्या दुसऱ्या व्यक्ती ठरल्या आहेत. आज मंगेशकर कुटुंबातील आणखी एका रत्नाचा यथोचित सन्मान महाविकास आघाडी सरकारने केल्यामुळे अतिशय आनंद झाल्याच्या भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

आशाताईंच्या अभिनंदन करतानाच श्री भुजबळ म्हणाले की आशाताईंनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांच्या सुमधुर आवाजाने त्या अनेक वर्ष संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील त्यांच्या कोट्यावधी चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या गायनाचा यथोचित गौरवच आहे.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT