Ashish Shelar
Ashish Shelar 
मुख्य बातम्या मोबाईल

महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले? शेलारांचा सेनेला सवाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महापालिकेच्या अर्थसंकल्पातील शिलकीतून ४०० कोटी रुपये कोरोना खर्चासाठी वर्ग करण्याचा प्रस्ताव शिवसेनेने बहुमताच्या जोरावर मंजूर केल्याच्या बाबत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. हा प्रस्ताव परत पाठवा  अशी सूचना स्थायी समितीत भाजपाच्या नगरसेवकांनी मांडली असता ती शिवसेनेने ना मंजूर का केली? का लपवाछपवी करताय? असा सवाल शेलार यांनी विचारला आहे. 

करोना संसर्गाचा प्रतिबंध व आरोग्य व्यवस्था उभी करण्यासाठी पालिका प्रशासनाने आकस्मिक निधीतून १६३२ कोटी रुपये खर्च केले आहे. त्यात आणखी ४०० कोटी अर्थसंकल्पाच्या शिलकीतून वळते करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी मंजूर करण्यात आला आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी आणि भाजप यांनी एकत्र येऊन या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, शिवसेनेनेहा प्रस्ताव मंजूर केला. 

मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनीही या प्रस्तावाला विरोध केल्याने शिवसेना एकाकी पडली होती. कालच्या बैठकीच्या वेळी भाजपने या विषयावर मतदानाची मागणी केली. परंतु, शिवसेनेने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. 

याबाबत शेलार यांनी दोन ट्वीट केली आहेत. मुंबईकर कोरोनाने दगावले मात्र पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कोरोना काळात आपले गोदाम भ्रष्टाचार करुन भरले? हिशेब द्या! अशी मागणीही शेलार यांनी केली आहे. मुंबई पालिकेचे कोरोनावर 6 महिन्यात १६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तरी अजून ४०० कोटी हवेत असे पालिका म्हणतेय. पण झालेल्या खर्चाचा हिशेब का देत नाही? महापौरांच्या मुलाला आणि जावयाला किती मिळाले? सॅनिटायझर पुरवणाऱ्या बोगस कंपन्यांच्या घशात किती घातले? पर्यावरण प्रेमी वरळीला किती गेले? असे सवाल शेलार यांनी उपस्थित केले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT