Athavale decided before the election, Mumbai's mayor, deputy mayor
Athavale decided before the election, Mumbai's mayor, deputy mayor  
मुख्य बातम्या मोबाईल

आठवलेंनी निवडणुकीआधीच ठरविले मुंबईचे महापौर, उपमहापौर 

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पक्षासोबत युती करेल. भाजप आणि रिपब्लिकन पक्षाच्या युतीचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत नक्की विजय होईल. निवडणुकीनंतर मुंबईत भाजपचा महापौर, तर रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर निवडून येईल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर व्हायची आहे. त्याआधीच आठवले यांनी पदाचे वाटप केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. 

मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि शिवसेना आपापल्या पद्धतीने कार्यरत झाले आहेत. भाजप विरुद्ध शिवसेना असा प्रमुख सामना मुंबई महानगरपालिकेत रंगण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची भीमशक्ती ज्यांच्या बाजूने उभी राहील, त्यांचा विजय निश्‍चित असल्याने रिपब्लिकन पक्ष भाजपला समर्थन देणार आहे. त्यासाठी लवकरच आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीची व्यूहरचना ठरविणार आहोत, असेही आठवले यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने अतुल भातखळकर यांना प्रभारी नेमले आहे. त्यानंतर पक्षाकडून निवडणुकीसाठी खास वॉर रुम सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबरच महापलिकेची निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर लढण्याचा भाजपचा विचार दिसत आहे. कारण, आतापर्यंतच्या त्यांच्या भूमिकामंधून रणनीतीची चुणूक दिसून येत आहे. 

दरम्यान, शिवसेनेनेही आपल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपवर वार करतानाच ही पालिका आपल्या हातून निसटू नये, याची पुरेपूर काळजी शिवसेना घेताना दिसत आहे. शाखांच्या माध्यमातून त्यांच्या कामालाही सुरुवात झाली आहे. 
दुसरीकडे कॉंग्रेस पक्षाच्या महापलिकेतील नेत्याने मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. त्यावर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मौन धारण केलेले आहे. राष्ट्रवादीने मात्र नेहमीप्रमाणे कॉंग्रेस नेत्यांना कानपिचक्‍या देत ज्या लोकांना तिकिट मिळेल की नाही आणि मिळाले तरी निवडून येण्याची खात्री नाही, असे काहीही बोलत आहेत. आघाडीबाबतचा निर्णय तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, असे शब्दांत सुनावले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT