ramdas athvale.jpg
ramdas athvale.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

"कम उद्धवजी कम!" युतीत येण्यासाठी आठवलेंची मुख्यमंत्र्यांना साद

सरकारनामा ब्युरो

मुंबई :  "गो करोना गो" या धर्तीवर  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ((Union Minister Ramdas Aathvale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांना पुन्हा भारतीय जनता पक्षात येण्याचे आवाहन केले आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi)  साथ सोडून भाजप बरोबर युतीत सहभागी होण्यासाठी रामदास आठवले यांनी  "कम उद्धवजी" अशा शब्दात उद्धव ठाकरे यांना साद घातली आहे. तसेच, त्यासाठी उद्धव ठाकरे यांना युतीत आणण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा,असे ही म्हटले आहे.

तीन पक्षाच्या महाविकास आघाडीची साथ सोडून ठाकरे यांनी भाजप बरोबर सत्ता स्थापन करण्याता सल्ला यावेळी आठवलेंनी दिला आहे.  महायुतीत यावे,आणि फडणवीसांचे गीत गावे. फडणवीसांनी एक दिवस मातोश्रीवर जावे, आणि उद्धवजींना घेऊन यावे, अशी कविता आठवले यांनी केली. गो कोरोनासारखी माझी हाक 'कम उद्धवजी' अशी असेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीसांना सल्ला देताना उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घ्यावे.अडीच वर्षे त्यांना द्यावीत, अडीच आपण घ्यावे,असेही आठवले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काल माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंचे कौतूकही केले.  'उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा नव्हती, पण अडीच- अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रस्तावावर शिवसेना-भाजपचे  एकमत न झाल्याने  युती (Shivsena- BJP Alliance)  तुटली.  शिवसेनेने  काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत (NCP- Congress) सत्ता स्थापन केली. त्यांच्याशी आघाडी करणंही योग्य नव्हतं, पण अजूनही वेळ गेलेली नाही. अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर युती होऊ शकते,' अशी आशाही रामदास आठवले   यांनी व्यक्त केली आहे. 

तसेच, यावेळी आठवलेंनी उद्धव ठाकरेंचे  तोंडभरून कौतुक केले. ' उद्धव ठाकरे हे अत्यंत साधेभोळे आणि चांगले गृहस्थ आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे उद्धव ठाकरे खरे वारसदार आहेत.  पण अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी पुन्हा भाजपात  परतावे,' असा सल्लाही आठवले यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT