atul-bhosale
atul-bhosale 
मुख्य बातम्या मोबाईल

रायबाच्या शिक्षणासाठी अतुल भोसलेंचा पुढाकार

सरकारनामा ब्यूरो

कऱ्हाड : तानाजी चित्रपटामुळे नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची शौर्यगाथा पुन्हा लोकांसमोर आली. मात्र, त्यांच्या कुटुंबियांकडे कुणाचे फारसे लक्ष गेले नाही. त्या कुटुंबाच्या धैर्याला आणि मालुसरे यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी त्यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस अतुल भोसले यांनी पुढाकार घेतला आहे. श्री. भोसले यांनी तानाजी मालुसरे यांची थेट वंशज शीतल मालुसरे यांच्याकडे 50 हजाराचा धनादेश सुपूर्द केला.

जयवंत इंजिनियरिंग महाविद्यालय व जयवंतराव भोसले पॉलिटेक्‍निक यांच्या वतीने शिवमहोत्सव कार्यक्रम झाला. त्याला तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे उपस्थित होत्या. त्यावेळी धनादेश देण्यात आला. या वेळी अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, अरूण घोडके, शिवकालीन शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य संजय पवार, कृष्णा फौंडेशनचे कार्यकारी संचालक प्रा. विनोद बाबर, कृष्णा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. बी. साळुंखे, प्राचार्य डॉ. उदयसिंह सुतार, सुमित माळी उपस्थित होते.

श्री. भोसले म्हणाले,"" छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व प्रेरणेने काम करत स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्या वंशजांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. समाजातील प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे यांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू.''

शीतल मालुसरे म्हणाल्या,"" सगळी सोंगे करता येतात. पण, पैशाचे सोंग करता येत नाही. राज्यात प्रथमच अतुल भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या वंशजांना अशाप्रकारची मदत केली आहे. रायबाच्या शिक्षणासाठी आमच्यासाठी मदत लाखमोलाची आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT