Jitendra Awhad .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

आव्हाडांची ऑडिओ क्लिप व्हायरल; ते प्रकरण मोठ्या नेत्यांपर्यंत गेलं तू यात पडू नकोस! 

त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा, अशी मागणी पुजारी यांनी केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अडचणीत आले आहेत. आव्हाड यांनी राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी (Mallikarjun Pujari) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका तरुणीवर एक उच्चभ्रू व्यक्ती गंभीर स्वरूपाचे अत्याचार करत आहे. या प्रकरणी संबंधित महिलेला मदत करणारे मल्लिकार्जुन पुजारी यांना आव्हाड यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी आव्हाडांनी फोनवरून दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Audio clip of Jitendra Awhad goes viral) 

पुजारी यांनी या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून आव्हाडांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे. त्यामध्ये पुजारी यांनी म्हटले आहे की, मुंबईत राहणाऱ्या एका तरुणीवर अनेक वर्षांपासून एका उच्चभ्रू व्यक्तीकडून अत्याचार होत होते. मात्र, या तरुणीची पोलिस तक्रार दाखल करून घेत नव्हते. त्यामुळे संबंधित तरुणी आपल्याकडे मदत मागायला आली होती. तरुणीला मदत करतानाच अंधेरी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.   

त्याचा राग मनात धरत आव्हाड यांनी आपल्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आव्हाड म्हणाले की, ''तू एका मुलीसाठी कुणाला तरी ब्लॅकमेल करत आहेस. मुलगी गेली, तिला मरू दे, तुला माहीत आहे का भूषण कुमार टी-सीरीजचा मालक आहे. तू या प्रकरणात पडू नकोस. मोठी माणसे विरुद्ध बाजूने आहेत. तुझे काही खरे नाही, असे आव्हाड म्हणाले. तसेच पीडित तरुणीबाबतही आर्वाच्च भाषेत बोलले.

अत्याचार करणाऱ्याचे स्टेट्स पाहून न्याय द्यायचा. सामाजिक कार्यकर्त्यांना धमकावायचे, जीवे मारण्याची धमकी द्यायची आणि खोट्या केसेस दाखल करायच्या व लोकशाही असल्याचा डंका बडवायचा, हे योग्य नाही. यापूर्वीही या मंत्र्याने सामाजिक कार्यकर्त्याला घरातून आणून मारले होते. या मंत्र्याकडून माझ्या जीविताला धोका आहे. मंत्र्याविषयी माझी तक्रार आहे. आव्हाड यांनी आमदार आणि मंत्रीपद स्वीकारताना राज्यपाल यांच्यासमोर घेतलेली शपथ खोटी ठरवली आहे. शपथेचा आणि राज्यघटनेचा अवमान आव्हाडांकडून झालेला आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा, अशी मागणी पुजारी यांनी केली आहे. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT