Narhari Zirwal
Narhari Zirwal 
मुख्य बातम्या मोबाईल

यामुळे आदिवासी कोरोना लसीकरणासाठी पुढे येत नाहीत...

सरकारनामा ब्युरो

नाशिक : आदिवासी समाज कोरोनावरील उपचार व लसीकरणासाठी साशंक (Trible people not coming forward for covid19 Treatment & Vaccination)  आहे. हे लोक उपचारासाठी पुढे येत नाहीत असे दिसते. त्यांच्यात निर्माण झालेले गैरसमज दूर करण्याची गरज आहे. आदिवासींना कोरोना आजाराचे गांभीर्य व लसीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती (Awareness Drive) करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नियोजन करण्यात यावे, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी सांगितले.  

कोरोनाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे उफस्थित होते. 

यावेळी श्री झिरवाळ  यांनी सिटीस्कॅन केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी पोलीसांनी कार्यवाही करावी असे सांगितले. ते म्हणाले, कारोनाबाधित रुग्णांची एच.आर.सी.टी करण्यासाठी सिटी स्कॅन सेंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे. तसेच बाजारपेठांवर होणाऱ्या गर्दीबाबतही कठोर कारवाई करण्यात यावी.

सुरूवातीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर पुरवठ्याबाबत व इतर आरोग्य सोयीसुविधांच्या बळकटीकरणासाठी केलेले नियोजन सादर केले. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणींच्या दृष्टीने ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिव्हिर, कोविड केअर सेंटर्स, लसीकरण आदी विषयांवर विविध सूचना केल्या. 

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, मालेगावच्या महापौर ताहेरा शेख रशिद, आमदार सर्वश्री नरेंद्र दराडे, ॲड  माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे, दिलीप बनकर, मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, नितीन पवार, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी उपजिलहाधिकारी भागवत डोईफोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT