balasaheb thorat pray to saibaba
balasaheb thorat pray to saibaba 
मुख्य बातम्या मोबाईल

कमी जागा मिळूनही कॉंग्रेसला सत्ता मिळाली, ही साईबाबांची कृपा!

सरकारनामा ब्युरो

शिर्डी : "पाच वर्षांपूर्वी मीच विरोधी पक्षनेतेपद घ्यायला हवे होते. त्याचा मला नक्की फायदा झाला असता. जे पक्ष सोडून गेले, त्यांची जागा आता नव्यांनी घेतली. तिकडे लाट असेल, असे त्यांना वाटले. पण, तसे काही नव्हते. आपण फसलो, पुन्हा आपल्या पक्षात जावे, असे काहींना वाटत असल्याचे समजते. मात्र, पक्ष संकटात असताना ज्या नव्यांनी त्यांची जागा घेतली, त्यांना त्याबाबत विचारावे लागेल,'' असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

थोरात यांनी आज दुपारी येथे येऊन साईदर्शन घेतले. विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन तोंडावर आले आहे. त्यामुळे आज किंवा उद्या खातेवाटप नक्की जाहीर होईल, असे सांगून थोरात म्हणाले, "हे तीन पक्षांचे सरकार आहे. आम्हाला ते पाच वर्षे चालवायचे आहे. तिन्ही पक्षांना समान संधी देऊन मंत्रिमंडळ विस्तार होईल. मी प्रदीर्घ काळ मंत्री होतो. त्यामुळे मला कुठलेही खाते मिळाले, तरी चांगले काम करून दाखविणे महत्त्वाचे आहे.'' कमी जागा मिळूनही कॉंग्रेसला सत्तेत जाण्याची संधी मिळाली, ही साईबाबांची कृपा आहे, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT