Bhor sabhapati Damayanti Jadhav and former sabhapati Shridhar Kendra were suspended from the NCP
Bhor sabhapati Damayanti Jadhav and former sabhapati Shridhar Kendra were suspended from the NCP 
मुख्य बातम्या मोबाईल

राष्ट्रवादीची मोठी कारवाई : भोरच्या विद्यमान सभापतींसह माजी सभापतींची पक्षातून हकालपट्टी

डॉ. संदेश शहा

इंदापूर (जि. पुणे) :  भोर पंचायत समितीच्या सभापती सौ. दमयंती जाधव, तसेच माजी सभापती श्रीधर किंद्रे यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली आहे. 

गारटकर पुढे म्हणाले, भोर पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी होती. निवडणुकीपूर्वी भोर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक  १६ फेब्रुवारी रोजी सभापती निवडीसंदर्भात भाटघर रेस्ट हाऊस येथे झाली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी केलेल्या मागणीनुसार सभापती पदासाठी लहू शेलार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्याप्रमाणे तालुकाध्यक्ष घोरपडे यांनी लहू शेलार यांच्या नावाचा व्हीप सर्व सदस्यांना बजावला होता. त्यावर सदस्यांनी व्हीप स्वीकारल्याच्या सह्यादेखील केल्या होत्या. 

भोर पंचायत समितीमध्ये ६ सदस्यांपैकी ४ राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच काँग्रेस १ आणि शिवसेना १ असे बलाबल असताना प्रत्यक्ष सभापती निवडीच्यावेळी दमयंती जाधव यांनी पक्षाच्या आदेशाचा भंग करून बंडखोरी करून सभापतीपदासाठी अर्ज भरला आहे. त्यांना सूचक म्हणून श्रीधर किंद्रे यांनी पाठिंबा दिला होता. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पक्षाचे सभापती पदाचे अधिकृत उमेदवार लहू शेलार व श्रीमती मंगलाताई बोडके यांनी पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये; म्हणून दमयंती जाधव यांना मतदान केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही सदस्यांकडून यासंदर्भात खुलासा पक्षश्रेष्ठींनी खुलासा मागविला होता. त्यात सभापती दमयंती जाधव व श्रीधर किंद्रे यांचा खुलासा योग्य वाटला नाही. त्यांची कृती पक्षहितास बाधा पोचवणारी असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे.त्यामुळे दोघांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.पक्ष पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी कोणताही राजकीय संबंध ठेवू नये, अशी सूचनाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT