Covid 19
Covid 19 
मुख्य बातम्या मोबाईल

भुसावळ, मुक्ताईनगर ठरताहेत कोरोना हॉटस्पॉट

सरकारनामा ब्युरो

जळगाव : शहरासह चोपडा, अमळनेर तालुक्यात काही प्रमाणात संसर्ग नियंत्रणात येत असला, तरी आता कोरोनाचा विळखा मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यात घट्ट होताना दिसतोय. जिल्ह्यात दिवसभरात ११ मृत्यू झाले, तर नव्या बाधितांएवढीच बरे होणाऱ्यांचीही नोंद झाली.

जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून आणि विशेषत: मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. बुधवारी दिवसभरात सात हजार ४२१ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यांपैकी ८४९ नवे रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या एक लाख ३२ हजार ४२३ झाली आहे, तर ८४७ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख २० हजार १५५ वर पोचला.

मृत्यूची संख्या घटली 
गेल्या तीन-चार दिवसांपासून दररोजच्या बळींचा आकडाही कमी होत आहे. तीन दिवसांपासून मृत्युसंख्या १५ च्या आत असून, बुधवारीही केवळ ११ मृत्यू झाले. एकूण बळींचा आकडा दोन हजार ३७४ झाला आहे. सारी, कोविड निगेटिव्ह, न्यूमोनिया, कोरोना संशयित आदींमुळे आठ मृत्यू झाले.

जळगाव शहरात दिलासा
जळगाव शहरातील नवीन रुग्णसंख्या तीन दिवसांपासून शंभराच्या आत आढळून येत आहे. बुधवारीही शहरात ८६ रुग्ण आढळले, तर १६२ रुग्ण बरे झाले. अन्य ठिकाणी आढळलेले रुग्ण : जळगाव ग्रामीण २२, भुसावळ १६३, अमळनेर २६, चोपडा ४२, पाचोरा १५, भडगाव ८, धरणगाव १५, यावल २५, एरंडोल २२, जामनेर ६१, रावेर ५२, पारोळा १६, चाळीसगाव ४८, मुक्ताईनगर १७१, बोदवड ५१, अन्य जिल्ह्यांतील २६.
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT