BJP ahesd in gujrat local bodies election
BJP ahesd in gujrat local bodies election 
मुख्य बातम्या मोबाईल

गुजरातमधील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवरही भाजपचेच वर्चस्व

वृत्तसंस्था

अहमदाबाद : महापालिका निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर भाजपने गुजरातमधील जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसला धोबीपछाड केले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निवडणुक निकालांध्ये भाजपने पंचायत समित्यांमध्ये 358 तर काँग्रेसने केवळ 94 जागांवर विजय मिळवला आहे. तर आपने चार जागा मिळवत खाते खोलले आहे.

गुजरातमधील सहा महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाले आहेत. आठही महापालिकांमध्ये भाजपचे कमळ फुलले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. तर आपने सुरत महापालिकेत जोरदार एंन्ट्री केली. रविवारी गुजरातमधील 81 नगरपालिका, 31 जिल्हा परिषदा आणि 231 पंचायत समित्यांची निवडणुक झाली. आज मतमोजणी सुरू असून आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये भाजपने मुसंडी मारल्याचे दिसते. पंचायत समितीमध्ये भाजपने 358 तर काँग्रेसने 94 जागा जिंकल्या आहेत. 

भाजप 231 पंचायत समित्यांपैकी 73 ठिकाणी तर काँग्रेस 11 ठिकाणी आघाडीवर आहे. जिल्हा परिषदांमध्ये 31 पैकी 28 मध्ये भाजपने बहुमताच्या दिशेने आघाडी घेतली आहे. नगरपालिकांमध्येही भाजपचेच वर्चस्व दिसून येत आहे. एकूण 81 पैकी 60 ठिकाणी भाजप आघाडीवर असल्याचे सुरूवातीचे कल सांगतात. 

महापालिका निवडणुकीत सुरतमध्ये 27 जागा जिंकून सर्वांनात धक्का देणाऱ्या आपने या निवडणुकीतही दमदार सुरूवात केल्याचे दिसते. आतापर्यंत पक्षाने 24 जागा जिंकल्याची माहिती पक्षाने दिली आहे. अनेक ग्रामीण भागात आपचे उमेदवार पुढे असल्याचा दावा आपने केला आहे. 

शेतकरी आंदोलनाचा परिणाण नाही

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा विजय मिळाला. तर भाजपला अनेक ठिकाणी खातेही खोलता आले नाही. गुजरात निवडणुकांमध्ये मात्र शेतकरी आंदोलनाचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळविली. आता ग्रामीण भागातही भाजपचेच वर्चस्व दिसत आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT