Ashish Shelar
Ashish Shelar 
मुख्य बातम्या मोबाईल

तेंडूलकर, साठे, आंबे़कर आता शिवसेनेला दुश्मन वाटतात! 

सरकारनामा ब्युरो

नाशिक : भारतीय जनता पक्षाने पोलिसांना सूचना देऊन आंदोलन केले. त्यानंतर शिवसेनेने यातील काही आंदोलक व महिलेवर हल्ला करणे हे औरंगजेबी वृत्तीचे प्रदर्शन आहे. (Shivsena shows there Orignal Vein) शिवसेनेच हिंमत असेल तर भाजपशी टक्कर घ्यावी (They should face BJP Front to Front) त्यांना चारी मुंडया चित करू, असे आव्हान भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला दिले.

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पोलिसांना पुर्वसूचना देऊन आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या आंदोलकांवर काहीही कारवाई अपेक्षित नव्हती असा दावा शेलार यांनी केला. मात्र या आंदोलनानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या आडून भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. एका महिलेला त्यांनी मारहाण केली. शिवसेना आता पाठीमागून हल्ले करू लागली, असे आमदार शेलार म्हणाले.

ते म्हणाले. भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा त्यांना सोडून द्यायला हवे होते.त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनकर्त्यांना मारहान केली. यासंदर्भात आम्ही पोलिसांना भेटलो. पोलिसांनी निष्पक्ष वागणे अपेक्षित आहे. अन्यथा हे आंदोलन अधिक वाढेल. 

आमदार शेलार यांनी लपून छपून पोलिसांची ढाल करून शिवसेनेने एका महिलेवर हल्ला केला. शिवसेनेने ही औरंगजेबी वृत्ती दाखविली आहे. ते सोनिया, वाड्रा यांना आपला देव मानतात तेव्हा तेंडूलकर, साखरे, आंबेकर यांना ते शिवसेनेचे दुश्मन  मानतात. यातून त्यांची मानसिक स्थिती लक्षात येते. असे म्हणतात, `लातो के भूत बातोसे नही मानते`. त्यामुळे यापुढे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल.त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी समोरा समोर मैदानात यावे, भाजप शिवसेनेला त्यांची लायकी दाखवून देईल, असे आव्हान शेलार यांनी दिले. ेह
...   

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT