Shivsena BJP
Shivsena BJP 
मुख्य बातम्या मोबाईल

शिवसेना आमदारांच्या बैठकीमुळे भाजपने राज्यपाल भेटीची वेळ बदलली?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सुधीर मुनगंटीवार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज सकाळी अकरा वाजता राज्यपालांची भेट घेणार होते. मात्र, आता ते दुपारी दोन वाजता राज्यपालांना भेटणार आहेत. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक 'मातोश्री'वर सुरु आहे. या बैठकीत काय होते, हे पाहून पुढील रणनिती आखण्याच्या दृष्टीने भाजपने बैठकीची वेळ बदलल्याचे बोलले जात आहे.

राज्यात सत्ता स्थापनेवरुन निर्माण झालेला तिढा अद्याप मिटलेला नाही. भाजप व शिवसेना या दोघांतही अद्याप संवाद नाही. त्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे नेते राज्यपालांना भेटणार होते. याबाबत पत्रकारांनी सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, "राज्यपालांकडे सकाळची वेळ मागितली होती. सकाळी त्यांनी इतर जणांना वेळ दिल्याने आम्हाला दुपारची वेळ मिळाली आहे. विधीमंडळ पक्षाच्या नेत्यानेच सत्तास्थापनेचा दावा केला पाहिजे असे नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष किंवा प्रतिनिधीही असा दावा करु शकतात.'' आजच्या भेटीत मात्र आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT