Sarkarnama Banner - 2021-05-08T121805.251.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-08T121805.251.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

आसामच्या  मुख्यमंत्री पदावरून दिल्लीत खलबतं सुरु..सर्वांनंद  सोनोवाल की हिमंत बिस्मा सर्मा ?

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : आसाम विधानसभा  निवडणूकीत भाजपने  बहुमत मिळवून दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करीत आहेत.आसामचे मुख्यमंत्री  सर्वांनंद  सोनोवाल आणि आरोग्य मंत्री हेमंत विश्व सर्मा यांच्यात सीएम पदावरून रस्सीखेच सुरू आहे. गृहमंत्री अमित शाह , भाजपचे  अध्यक्ष  जे.पी. नड्डा, भाजप संघटन महासचिव बिएल  संतोष  यांच्यात आसामच्या मुख्यमंत्री पदाबाबत  चर्चा  होणार आहे.  bjp confused who should be made chief minister assam

सर्वानंद  सोनोवाल  आणि हेमंत बिस्म सर्मा यांनाही  केंद्रीय नेतृत्वाने आज  दिल्लीत बोलावले आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे सरचिटणीस (संघटना) बीएल संतोष बैठकीसाठी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. 

आसाममध्ये कुणाला मुख्यमंत्री करायचे यावरून सध्या चर्चा सुरु आहे. भाजप व्दिधा मनस्थितीत आहे. मुख्यमंत्री सर्वंनंद सोनोवाल यांना बाजूला करून हिमंत बिस्मा सर्मा यांना मुख्यमंत्री करण्यात येईल, अशी चर्चा आहे. पण सोनावाल यांना बाजूला सारले तर भविष्यात ते भाजपला महागात पडण्याची शक्यता आहे. 

निवडूक प्रचारात मुख्यमंत्री कोण होणार याचे उत्तर भाजपने दिले नव्हते. हिमंत बिस्वा सर्मा यांच्या दबावामुळे हा मुद्दा भाजप टाळत आला आहे. सोनोवार व हिमंत बिस्वा सर्मा या दोघांनीही आसाममध्ये भाजपला जनाधार मिळवून दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे लवकरच कळेल.

हेही वाचा : भाजप आमदाराचा  VIDEO व्हायरल...म्हणाले, "गोमूत्र प्या...कोरोना होत नाही..." 

लखनऊ: नेहमीच वादग्रस्त व्यक्तव्य करणारे भाजपचे आमदार पुन्हा अशा एका वादग्रस्त व्यक्तव्याने चर्चेत आले आहे.  दररोज गोमूत्रं प्राशन केल्याने कोरोना होत नाही, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे. याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.  कोरोनापासून बचाव करण्यासाठी उत्तर प्रदेशच्या बलियाच्या बैरिया विधानसभेचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी  "मी रोज गोमूत्र पितो. त्यामुळेच निरोगी आहे. सकाळी ब्रश केल्यानंतर काहीही न खाता ठंड पाण्यात 5 झाकण गोमूत्र मिसळून प्यावं आणि यानंतर अर्धा तास काहीच खाऊ नये, " असा सल्ला देत स्वतः गोमूत्र पितानांचा व्हिडिओ शेअर केला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT