Dhule Mayor
Dhule Mayor 
मुख्य बातम्या मोबाईल

महापौर निवडणुकीमुळे भाजप नगरसेवकांचे पर्यटन जोमात!

सरकारनामा ब्युरो

धुळे : येथील महापौर पदासाठी १७ सप्टेंबरला निवड प्रक्रिया राबविली जाईल. (Mayor election is on 17th September) तत्पूर्वी, सत्ताधारी भाजपमधील नाराज १७ नगरसेवकांचा गट विरोधकांशी हातमिळवणी करू शकतो, (Bjp`s 17 corporators could make settlement with opposition) अशी चर्चा उसळली. त्यामुळे खबरदारी म्हणून महापौर पदाचे प्रमुख दावेदार आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी, नेत्यांनी आपल्या बहुसंख्य नगरसेवकांना (Bjp took precaution 7 send corporators for tour)प्रथम दमण (Daman) आणि आता सेल्वासाला (Selvas) पर्यटनासाठी नेत एकत्रित ठेवले आहे. 

दोन दिवसांपूर्वी दमण येथे भाजपच्या संबंधित नगरसेवकांवर नियंत्रण व देखरेखीसाठी एका व्यक्तीची नेमणूक केली. तेथे दोन नगरसेवक व देखरेख ठेवणाऱ्या व्यक्तीमध्ये वाद झाले. त्यातच महापौर पदाचे प्रमुख दावेदार प्रदीप कर्पे यांना एकट्यालाच धुळ्यात बोलावीत सोमवारी (ता.१३) शेवटची मुदत असताना अर्ज सादर केला.

ते लक्षात आल्यावर दमणला पर्यटन करणाऱ्या इतर नगरसेवकांसह अन्य महापौर पदासाठीच्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला. त्यात एका महिला नगरसेविकेचा रक्तदाब कमी झाला. त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू झाले. मात्र, या गोंधळात दमणमधील ज्या हॉटेलमध्ये वाद झाले. तेथील मालकाने या स्थितीवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नगरसेवकांना रातोरात सेल्वासा येथे पर्यटनासाठी स्थलांतरित केले. 

असे असले तरी भाजपच्या गोटातील नाराज १७ नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी करत आहेत. मात्र, यासंदर्भात शिवसेना, काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाली नाही. उलट उमेदवारी अर्ज भरताना महाविकास आघाडीमधील घटक पक्षांतर्फे येथे स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

त्यामुळे त्या नाराज १७ नगरसेवकांची हवा निघून गेल्याचे बोलले जाते. भाजपने ७४ पैकी ५० नगरसेवक निवडून आणत महापालिकेत सत्ता हस्तगत केली आहे. त्यामुळे विरोधकांना कुठलीही संधी न देता महापौर पद आपल्याकडेच राहावे म्हणून भाजपकडून पुरेपुर दक्षता घेतली जात आहे. या सर्व घडामोडींबाबत मात्र शहरात रंगतदार उलटसुलट चर्चा घडत आहे. 
 ...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT