Anil Deshmukh
Anil Deshmukh 
मुख्य बातम्या मोबाईल

आम्ही नागपुरातही भाजपचा पराभव केला !

सरकारनामा ब्युरो

नाशिक : आज आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांतून जनतेने राज्यातील महाविकास आघाडीला भरभरुन पाठींबा दिल्याचे दिसते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळाले आहे. आम्ही नागपूरातही भारतीय जनता पक्षाचा पारभव  केला आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. 

गृहमंत्री देशमुख नाशिकच्या खासगी दौ-यावर होते. यावेळी ते म्हणाले, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आघाडीने मोठे यश मिळवले आहे. हे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला मिळालेले मोठं यश आहे. अर्थात हे सर्व आघाडीतील राजकीय पक्षांतील समनव्याचं यश आहे. या पुढील निवडणुकांतही हे सगळे एकत्र असतील. त्यामुळे सध्या विरोधकांना मुंगेरीलाल का सपने पडत आहेत. औरंगाबाद शहराच्या नामांतर विषयात समन्वय समिती चर्चा करून मार्ग काढेल. 

श्री. देशमुख म्हणाले, विरोधी पक्ष सातत्याने विविध राजकीय दावे करीत आला आहे. वातावरण बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मात्र त्यांनी आजवर राज्यातील महाविकास आघडीविषयी जेजे दावे केले होते ते सर्वच हवेतले दावे ठरले आहेत. कारण महाविकास आघाडी भक्कम व एकोप्याने काम करीत आहेत. राज्यातील कोरोनासह विविध अडचणींवर मात करते आहे. त्यांच्या यशस्वी कामकाजाला जनतेचा पाठीबा मिळतो आहे, असे निकालांतून स्पष्ट झाले. त्यामुळे विरोधी पक्षांनी मुंगेरीलालची स्वप्ने पाहणे थांबवावे. कारण ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना जनतेने साथ दिलेली नाही. अगदी नागपुरातही महाविकास आघाडीने भाजपचा पराभव केला. येत्या निवडणुकातही महाविकास आघाडी सोबतच असेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलिस गणवेशाबाबत सूचना आली आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT