vijaydada_modi Fadnavis
vijaydada_modi Fadnavis 
मुख्य बातम्या मोबाईल

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर भाजपची पोलादी पकड

संतोष सिरसट

सोलापूर : भाजपने जिल्ह्याचे निरीक्षक राम शिंदे यांच्या उपस्थितीत इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच घेतल्या. एकेकाळी भाजपला जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार मिळणे मुश्‍कील होत होते. त्याच भाजपची स्थिती जिल्ह्यात खूपच चांगली झाली आहे. 

11 पैकी 11 मतदारसंघात भाजपकडे उमेदवार आहेत. पण, त्यापैकी नऊ मतदारसंघातील उमेदवार हे तुल्यबळ आहेत. 

त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे युती होणार असे म्हणत असले तरी त्या दोघांनीही स्वबळाची तयारी सुरू केली असल्याचे जिल्ह्यात घडत असलेल्या घटना-घडामोडींवरून स्पष्ट होते. स्वबळाच्या दृष्टीनेच त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांना आपापल्या पक्षामध्ये प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. 

जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन पैकी दोन आमदारांना आपल्याकडे वळविण्यात युतीला यश आले आहे. कॉंग्रेसचे तीन पैकी दोन आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील एक महिन्यापासून जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे . 

भाजपकडे सध्या करमाळा व सोलापूर शहर मध्य या दोन मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार नाहीत. पण, भविष्यात या दोन्ही मतदार संघातही भाजपला तसा उमेदवार मिळणे कठीण जाणार नाही. शिवसेना-भाजपची युती न झाल्यास सोलापूर शहर मध्यमधून शिवसेनेने जर माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी दिल्यास त्याच मतदारसंघातून भाजपने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे यांना उमेदवारी दिल्यास नवल वाटायला नको. 

तशीच स्थिती करमाळा विधानसभा मतदारसंघाची आहे. आमदार नारायण पाटील असतानाही करमाळ्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्‍मी बागल यांनाही शिवसेनेने पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आमदार पाटील यांना उमेदवारी दिली नाही तर ते कदाचित भाजपचे उमेदवार असतील असेही तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबनराव शिंदे यांनीही भाजपकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अक्कलकोट विधानसभेसाठी कॉंग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे तर पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके हेही भाजपकडून इच्छुक आहेत. 


तुल्यबळ असलेले भाजपचे संभाव्य उमेदवार 
अक्कलकोट  : सचिन कल्याणशेट्टी, 
सोलापूर दक्षिण : सहकारमंत्री सुभाष देशमुख, 
सोलापूर शहर उत्तर : पालकमंत्री विजयकुमार देशमुख, 
मोहोळ : संजय क्षीरसागर, 
बार्शी : राजेंद्र राऊत, 
मंगळवेढा : आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे,
 माळशिरस : मोहिते-पाटील ठरवतील तो उमेदवार, 
सांगोला : श्रीकांत देशमुख,
 माढा : बबनराव शिंदे, 
सोलापूर शहर मध्य : (युती न झाल्यास महेश कोठे) 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT