MLA Ram Satpute
MLA Ram Satpute 
मुख्य बातम्या मोबाईल

आमदार राम सातपुते यांना राष्ट्रीय राजकारणात संधी

सरकारनामा ब्यूरो

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विश्‍वासू समजले जाणारे माळशिरसचे आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute) यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर (BJYM) निवड झाली आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक राहिल्यानेच सातपुते यांना फडणवीस यांनी संधी दिल्याचे दिसत असून या निमित्ताने सातपुते यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर एकूण सात जणांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून आमदार सातपुते यांच्याबरोबर मधुकेश्‍वर देसाई यांना संधी मिळाली आहे. इतर उपाध्यक्षांमध्ये पश्‍चिम बंगालमधून अनुप कुमार साहा, बिहारमधून मनिष सिंह, ओडिशामधून अर्पिता अपरिाजिता बडजेना,उत्तरप्रदेशमधून अभिनव प्रकाश व उत्तराखंडमधून नेहा जोशी यांची निवड करण्यात आली आहे. भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांच्या नेतृत्वाखाली ही नवी टीम तयार करण्यात आली आहे.

नाना पटोलेही निघाले राज्यपालांच्या भेटीला...

आमदार सातपुते हे महाराष्ठ्र भाजपातील सर्वात तरूण आमदार आहेत. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री म्हणून काम केल्यानंतर अगदी कमी वयात त्यांना आमदारकीची संधी मिळाली.भाजपाचे आक्रमक आमदार अशी त्यांची ओळख आहे.ऊसतोडणी कामगाराचा मुलगा ते पहिल्याच प्रयत्नात आमदार अशी सातपुते यांची ओळख असून नव्या जबाबदारीमुळे आमदार सातपुते यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.

उत्तर प्रदेशासह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी देण्यात येणार असून त्या दृष्टीने पक्षाकडून ही नवी टीम तयार करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT