Raovsaheb danve  news parbhani
Raovsaheb danve news parbhani 
मुख्य बातम्या मोबाईल

दोन महिन्यात राज्यात भाजपचे सरकार, दानवेंचा दावा..

गणेश पांडे

परभणी ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी भिन्न विचारांच्या पक्षातील नेत्यामध्ये प्रचंड बेबनाव निर्माण झाला आहे. कुणाचा पायपुस कुणाला नाही. त्यामुळे हे सरकार येत्या दोन महिण्यात कोसळणार असल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. राज्यातील जनतेला भाजप सारखा पक्ष हवा आहे, ते या निवडणुकीतून परत सिध्द होईल असेही दानवे म्हणाले.

मराठवाडा पदवीधरचे भाजप  उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत परभणीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दानवे यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे भाकित केले.

सध्या मराठावाडा पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे अनेक नेते मराठवाड्यात प्रचार सभा, बैठका घेत आहेत. परतूर येथील मेळाव्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील पदवीधरच्या निवडणुकीनंतर राज्यात सत्तापालट होणार ्असल्याचा दावा केला होता. त्यापाठोपाठ दानवे यांनी देखील तो केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

दानवे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील नेतै, मंत्र्यांमध्ये अजिबात समन्वय नाही. वीज बील माफी वरून त्यांच्या मंत्र्यांनी केलेले घुमजाव याचे ताजे उदाहरण आहे. कुणाचा पायपोस कुणाला नसल्यामुळेच येत्या दोन महिन्यात हे सरकार कोसळेल आणि पुन्हा भाजपचे सरकार सत्तेवर येईल.

दानवेंनी कोरोनामुळे घेतली काळजी..

सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे, कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण आप - आपल्या पध्दतीने काळजी घेतांना दिसत असतांनाच दानवे यांनी देखील ती घेतल्याचे पहायला मिळाले. भाषणाला उभे राहिल्यानंतर तोंडाचा मास्क काढून दानवेंनी तो माईकला घातला. माझ्या आधी बरेचजण बोलून गेले आहेत असे म्हणत त्यांनी सभास्थळी एकच हशा पिकविला.

Edited By : Jagdish Pansare

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT