Sanjay Raut, Chitra Wagh .jpg
Sanjay Raut, Chitra Wagh .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

खायचे कुणाचे आणि गायचे कुणाचे? चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला  

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीतील एका बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी या पीडित कुटुंबासोबतचा फोटो ट्विट करून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली होती. मात्र, हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्र लिहिले होते. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. (BJP leader Chitra Wagh criticizes Sanjay Raut) 

चित्रा वाघ यांनी या संदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की ''सर्वज्ञानी संजयजी राऊत यांना राहुलजी गांधी यांनी कौतुकाची थाप काय दिली तर आपला त्यावर स्वामीनिष्ठा त्यावर आपली परस्वामीनिष्ठा उफाळून येणे स्वाभाविकच आहे. खायचे कुणाचे आणि गायचे कुणाचे? हे आपले वागणे खरोखर कौतुकास्पद आहे, संजयजी पण स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी बलात्कारासारख्या गंभीर विषयाचेही राजकीय भांडवल करणे हे निंदनीय आहे. असा टोला वाघ यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. 

''पूजा चव्हाणाच्या मारेकऱ्यांना कोण अभय देतय आणि पुणे पोलिसांची त्यात कशी भूमिका राहिली आहे, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय. नव्या अभिनेत्रीला संधी देतो म्हणून शरिर सुखाची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला आत्ताच लोकांनी चोप दिला. महाविकास आघाडीतील किती जणांचे हात महिलांविरोधी कृत्यांमध्ये बरबटलेले आहेत हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय. आपल्या अत्याचाराविरूद्ध सुद्धा राज्यातील एका भगिनी न्याय मिळण्याकरिता उच्च न्यायालयात दाद मागतीये आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत, आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत आम्ही या अत्याचारविरोधात अन्यायविरोधात या विकृतीविरोधात लढतोय व लढत राहू. त्यामुळेच की काय आपल्याला भितीपोटी असे दाखले द्यावे लागतात'' असेही वाघ म्हणाल्या आहेत. 

संजय राऊत काय म्हणाले होते.   

राहुल गांधींनी पीडित कुटुंबाचा ट्विटरवर फोटो ठेवणे हा गुन्हा आहे का?, असा सवाल राऊत यांनी केला होता. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवर त्या कुटुंबासोबतचा फोटो टाकला. हा फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्र लिहिले. हा काय प्रकार आहे. ही तर एख प्रकारची हुकूमशाहीच झाली. त्या कुटुंबाची माहिती विरोधी पक्षाचा नेता जनतेला देत असेल तर गुन्हा आहे का?, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा निर्भयाच्या कुटुंबांना भेटले होते. तेव्हाही ते फोटो प्रसिद्ध झाले होते. तेव्हा ते फोटो काढा असे राष्ट्रीय महिला आयोग किंवा अन्य कुणी सांगितल्याचे आठवत नाही, असे संजय राऊत म्हणाले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT