Sharp Criticism by BJP Leader Eknath Khadse on Party Leadership
Sharp Criticism by BJP Leader Eknath Khadse on Party Leadership 
मुख्य बातम्या मोबाईल

माझ्यासारख्यांना विश्वासात घेतले असते तर पंचवीस जागा वाढल्या असत्या : एकनाथ खडसे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : जर आमच्या सारख्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवली गेली असती तर भाजपच्या पाच पंचवीस जागा वाढल्या असत्या, असा टोला भाजपचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. मला डावलण्याचे कारण काय होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

विधानभवनात पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे शरसंधान केले. ते म्हणाले, ''आमच्यासारख्या अनेक नेत्यांनी भाजप पक्ष महाराष्ट्रात रुजवण्याचे व वाढवण्याचे काम केले. जेव्हा  लोक दगड व शेण मारत होते तेव्हा आम्ही भाजपसाठी लढत होतो. माझ्या सारख्याने चाळीस वर्षे पक्षाची सेवा केली आहे,'' मला डावलण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी व्यथित होऊन विचारला

''ज्यांनी ज्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले त्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचे काम करण्यात आले. सर्वांनाघेऊन लढले असते तर तर पाच पंचवीस जागा वाढल्या असत्या. मी, विनोद तावडे, प्रकाश महेता, चंद्रशेखर बावनकुळे अशांना तिकीट दिले नाही हे ठीक आहे. पण आम्हाला विश्वासात घेतले असते तर जागा नक्कीच वाढल्या असत्या.'' असेही ते म्हणाले.

सिंचन घोटाळ्याच्या काही फाईल्स बंद केल्या आहेत. त्यावरही खडसेंनी टीका केली. आम्ही सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीवर पुरावे दिले होते. सिंचन घोटाळ्याचे ते सर्व पुरावे रद्दीत विकले, असे सांगत तेव्हा रद्दीचा भावही जास्त होता असा टोलाही त्यांनी मारला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT