Girish Mahajan
Girish Mahajan 
मुख्य बातम्या मोबाईल

जामनेरमध्ये ठरले गिरीश महाजनच अव्वल

कैलास शिंदे

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या जामनेर मतदार संघात ग्रामपंचायत निवडणूकीत वर्चस्व कायम राखले आहे. ६८ पैकी तब्बल ४५ ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकविला आहे.

भारतीय जनता पक्षाचे ‘संकटमोचक’असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदार संघात एकूण ७३ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत्या,त्या पैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर वडगाव ब्रुद्रूक ग्रामपंचायतीने निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. उर्वरीत ६८ ग्रामपंचायतीत निवडणूका घेण्यात आल्या आहे.

जळगाव जिल्हयातील भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यानतंर त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता, त्यांच्यावर शाब्दीक हल्ला केला, त्यात ‘बीएचआर’पंतसंस्थेचा घोटाळा बाहेर आला. त्याबाबत गिरीश महाजन यांच्याकडे संशयाने पाहिले जात होते.

तसेच मविप्र संस्थेतील संचालक वाद प्रकरणातही गिरीश महाजन यांचे नाव आले, त्यांच्यावर थेट मारहाणीचा गुन्हा  पुणे येथे दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे जिल्हयात खळबळ उडाली आहे. जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवहणूकीत यशासाठी भाजप विरूध्द राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेने कंबर कसली होती. या निवडणूकीकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष होते.

गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाची कसोटी होती. मात्र त्यात गिरीश महाजन यशस्वी झाले आहेत. तालुक्यातल ६८ ग्रामपचायतीपैकी भारतीय जनता पक्षाने तब्बल ४५ जागावर विजय विजय मिळविला आहे. उर्वरीत जागावर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, व शिवसेनेने विजय मिळविला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांची जामनेर तालुक्यात अद्यापही पकड कायम असल्याचे दिसून आले आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT